शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या तालुक्यातील धजापाणी, केलवापाणी, माळखुर्द या गावांना आमदार राजेश पाडवी यांनी प्रथमच ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या तालुक्यातील धजापाणी, केलवापाणी, माळखुर्द या गावांना आमदार राजेश पाडवी यांनी प्रथमच भेट दिली. या वेळी धजापाणी येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी प्रश्न व वीज प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार पाडवी यांनी आपल्या स्थानिक निधीतून तत्काळ चार हातपंप देण्याचे आश्वासन दिले. आपल्या गावात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच आमदार आल्याने गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता.आमदार राजेश पाडवी हे निवडून आल्यानंतर मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गावकºयांशी संवाद साधत आहेत. आतापावेतो त्यांनी शहादा-तळोदा तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या गावातील समस्यांबाबत पाठपुरावा केला आहे. शनिवारीदेखील त्यांनी तळोदा तालुक्यातील केवलापाणी, धजापाणी व माळखुर्द या दुर्गम भागातील गावकºयांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या वेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, तळोदा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष बळीराम पाडवी, पंचायत समती सदस्य विजय राणा, माळद्याचे सरपंच गोपी पावरा, छगन कोठारी, जोलू वळवी, भाईदास वळवी, सजन शेवाळे, जिल्हा परिषद सदस्य भरत पवार, रवींद्र भिलाव, बाबुलाल पावरा आदी उपस्थित होते.प्रारंभी आमदार पाडवी यांच्या हस्ते नवीन बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गावकºयांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी गावकºयांनी धजापाणी गावात पिण्याचे पाणी, विजेचा प्रश्च मोठा असून तो मार्गी लावण्याची मागणी केली. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आमच्यावर येत असते. त्या वेळी आमदार पाडवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून गावात पाच हातपंप, एक बोअरवेल देण्याचे ठोस आश्वासन दिले. याशिवाय विजेसाठी सौर दिवे देण्याचे सांगितले. यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठविण्याची सूचनादेखील संबंधीतांनी दिली. त्याचबरोबर केवलपाणी व माळखुर्द येथील गावकºयांची भेट घेतली. तेथे गावकºयांनी रस्त्यांची मागणी केली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते करण्याचे आश्वासन दिले.