शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बामखेडा ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त., येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त., येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला नाशिक येथून शहादा येथील विलगीकरण कक्षात गुरुवारी दाखल करण्यात आले. तसेच या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यातील रुग्णाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचीही गुरुवारी घरवापसी झाली.सरपंच लीना चौधरी, पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, ग्रामविकास अधिकारी पी.व्ही. बाविस्कर, आरोग्य सेविका अलका मराठे, मनोज चौधरी, संगणक चालक कैलास गवळे, प्रल्हाद कुलथे, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती या रुग्णाच्या कुटुंबाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या कुटुंबाला प्रशासनातर्फे पुढील आठवडाभर होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बामखेडा येथील रुग्णावर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात दुसऱ्या आजारावर उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणीही घेण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली होती. आधी १६ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी कुटुंबातील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. नंतर त्यामधील तीन डॉक्टर व दोन चालक असे उर्वरित लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचेही अहवाल निगेटव्ही आले आहेत. परंतु अजून एक किंवा दोन दिवस त्यांना शहादा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे, असे समजते.कोरोना रुग्णाची जिल्हावापसीबामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला नाशिक येथे उपचारादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानंतर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात कोरोनाचे उपचार सुरु होते. त्यांचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी सकाळी या रुग्णाला शहादा येथील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. पुढील आठवडाभर तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु राहतील, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

बामखेडा त.त., ता.शहादा येथे गेल्या पाच दिवसांपासून सर्व गाव लॉकडाउन होते. परंतु सर्व व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आल्याने गावात काहीअंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे. त्यामुळे गावातील किराणा दुकान, बँक, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शेती कामे आदी सर्व सोशल डिस्टस्टिंगचे पालन करीत सुरळीत सुरु करण्यात आली.