शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणीटंचाईने ग्रामस्थ बेहाल : अक्कलकुवा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:01 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : अक्कलकुवा शहरातील प्रभाग क्र. 3 मध्ये  वीजपुरवठा करणा:या तीन विद्युत रोहित्रांपैकी दोन विद्युत रोहित्रात बिघाड झाला आह़े त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रभागातील गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आह़े ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात येत आह़े परिसरातील इंदिरानगर, बच्चूभाईनगर, सीतानगर, शिक्षक कॉलनी परिसर आदी गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र भावना उमटताना दिसून येत आहेत़ संबंधित परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत         आहेत़ उन्हाची तीव्रता वाढत असून उकाडय़ानेही ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा होत नसल्याने विजेवर चालणारे यंत्र बंद असल्याने ग्रामस्थांचे कुलर, पंखे बंद आहेत़ त्यामुळे त्यांना नाइलाजास्तव   इतरत्र गारव्याचे ठिकाण शोधावे लागत आहे व तेथेच दुपारची वेळ घालवावी लागत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़ेदरम्यान, अक्कलकुवा ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपूर्वीच या भागातील ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी म्हणून बोअरवेल केली होती़ मात्र तीन दिवसांपासून विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने संबंधित परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आह़े यामुळे येथील रहिवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊन पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आह़े दिवसागणिक तापमानात वाढ होत आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच होरपळून निघत आहेत़ त्यातच महावितरणच्या अशा भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ जेरीस आले आहेत़ दुपारच्या वेळी पंखे तसेच कुलरशिवाय घरात राहणे कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे आबालवृद्धांना या त्रासाचा सामना करावा लागत आह़े परिसरात दुपारच्या वेळी झाडांखाली येथील रहिवासी बसलेले दिसून येत असतात़ काहींकडून खाट टाकून येथेच झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली आह़े दुपारच्या वेळी हवादेखील नसल्याने ग्रामस्थ होरपळून निघत आहेत़ याशिवाय दैनंदिन गरजेपुरते लागणारे पाणीही मिळत नसल्याने अखेर सरपंच उषाबाई बोहरा तसेच उपसरपंच मक्राणी व विश्वास मराठे यांच्याकडून जनरेटरच्या साहाय्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आह़े