शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारातील शेतात चारा कापत असलेल्या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : मध्यप्रदेशातील पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारातील शेतात चारा कापत असलेल्या महिलेवर बिबटय़ाने अचानक हल्ला करून तिला ओढत नेऊन लचके तोडून जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याप्रकरणी घटना घडताच वनविभागावर राग व्यक्त करण्यासाठी संतप्त जमाव वनविभागाच्या कार्यालयावर चालून आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या पानसेमल तालुक्यातील जुनापाणी शिवारात रवींद्र रंगराव पाटील यांच्या शेतात चारा कापत असलेल्या बेरीबाई कांतीलाल भिल (45) या महिलेवर बिबटय़ाने  अचानक हल्ला केला. या वेळी महिलेला  बिबटय़ाने दूर्पयत ओढत नेऊन तिचे लचके तोडून जागीच ठार केले. बिबटय़ाने बेरीबाईला ओढून नेल्याचे लक्षात येताच त्यांचे पती व आजूबाजच्या लोकांनी पडलेल्या रक्ताच्या थेंबावरून शोधाशोध केली व बिबटय़ाला हुसकावून लावले तो  र्पयत बेरीबाई ठार झाल्या होत्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, वनविभागाचे वनक्षेत्रपाल  मंगेश बुंदेला यांनी आपल्या सहका:यांसह घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छदनानंतर प्रेत नातेवाईकांना ताब्यात दिले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असल्याने  घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या प्रकरणी संतप्त जमावाने वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा वळवला. सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने चार ते पाच पिंजरे लावली असून, बडवाणी येथून आणखी पाच ते सहा पिंजरे मागविण्यात येणार आहेत. या प्रकरणी मयताच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून 11 हजार रुपये देण्यात आले. शवव्छिेदनाचा अहवाल आल्यानंतर चार लाखाची शासकीय मदत दिली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक के.एस. पट्टा व प्रांताधिकारी विजय गुप्ता यांनी    दिली.