शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेरी नदीवरील पुलाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ

By admin | Updated: January 20, 2017 00:34 IST

सोमावल : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ते एकधड गावादरम्यान असलेल्या देववाल्हेरी नदीवर पूल नसल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़

सोमावल : तळोदा तालुक्यातील वाल्हेरी ते एकधड गावादरम्यान असलेल्या देववाल्हेरी नदीवर पूल नसल्याने वाहनधारकांसह विद्यार्थी व शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े ग्रामस्थांनी वारंवार पुलाची मागणी करूनदेखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झालेले असल्याचा आरोप करण्यात येत आह़े तालुक्यातील देववाल्हेरी नदीवरील अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत आह़े तसेच परिसरातील विद्याथ्र्यानाही शाळेत जाण्यासाठी   तारेवरची कसरत करावी लागत आह़े नदीच्या पात्रात असलेल्या मोठ-मोठय़ा दगडांमधून मार्ग काढावा लागत आह़े तसेच इतर चारचाकी वाहनांचीदेखील अशीच काहीशी परिस्थिती आह़े परिसरातील ग्रामस्थांना पावसाळ्यात याचा मोठय़ा प्रमाणात त्रास होतो़ पावसाच्या पाण्यामुळे परिसरात संपूर्ण चिखल पसरलेला असतो़ त्यामुळे त्यातून वाट काढणे अवघड असत़े 2015 साली परिसरात आलेल्या पुरात वाल्हेरी येथील अमरसिंग वसावे यांना आपला प्राणदेखील गमवावा लागला होता़ देववाल्हेरी नदीवर पुलाचे बांधकाम अपूर्ण आह़े त्यामुळे बांधकाम पूर्ण करण्याबाबत ग्रामस्थांकडून सतत पाठपुरावा करण्यात येत आह़े परंतु तरीदेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने यामुळे ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त कण्यात येत आह़े पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आह़ेदरम्यान, रात्रीच्या वेळी पुलावरुन वाहतूक करणे धोकेदायक ठरत आह़े पुलाचे बांधकाम अपूर्ण झाले असून व उर्वरित भाग कच्चा असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात वाहन चालविताना अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघातदेखील झाले आह़े  त्यामुळे अनेक ग्रामस्थ यामुळे नाराज आहेत़  प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यावरही यावर कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांना मनस्ताप होत आह़े (वार्ताहर)