शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बारमाही गाव तलावाने सुखावताय समशेरपूर येथील ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 12:46 IST

समशेरपूर : ग्रामस्थांनी लोकसहभागातून केले पाण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील सांडपाण्याच्या गाव तलावामुळे चटके देणा:या उन्हाळ्यातसुध्दा ग्रामस्थ सुखावत असल्याचे चित्र दिसून येत आह़े ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे त्यांना उन्हाळ्यात या तलावाचा आधार मिळत आह़े नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागाला नेहमीच कोरडय़ा दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असतात़ त्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिना पाण्याविना काढणे येथील ग्रामस्थांना मोठे अवघड जात असत़े वाढत्या तापमानामुळे येथील सर्व जलस्त्रोत कोरडे होत असतात़ मोजक्या विहिरी, कुपनलिका तसेच हातपंप यातूनही पाणी मिळवणे कठीण होत असत़े त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये येथील ग्रामस्थांना उन्हाचे चटके सहन करत पाण्यासाठी वणवण करावी लागत असत़े त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत काही वर्षापूर्वी गावातील सांडपाण्याची साठवणुक करण्याचे ठरवल़े त्यानुसार गावाच्या बाहेर खोलीकरण करुन गावाचे सांडपाणी बाधण्यात आलेल्या तलावाच्या दिशेने वळवल़े त्याच सोबत या गाव तलावाच्या लगत गुरांना पाणी पिण्यासाठी तसेच धुण, भांडी करण्यासाठी लागणारे पाण्याचे हौदसुध्दा तेथेच बांधल़े जेणेकरुन हे पाण्याचे हौद ‘ऑव्हर फ्लो’ झाल्यास ते पाणीसुध्दा गाव तलावात जावून मिळत असत़े त्यामुळे ग्रामस्थांना उन्हाळ्यात निर्माण होणा:या पाणी टंचाईची झळ सोसने काही प्रमाणात सोपे जात आह़े मत्स्यपालनाला वावया गाव तलावात मत्स्यपालनालासुध्दा वाव आह़े किंबहुणा यातून मोठय़ा रोजगाराचीसुध्दा निर्मिती होऊ शकत़े बहुतेक ग्रामस्थांकडून यात मत्स्य बीज टाकण्यात येत असत़े त्यानंतर ते मासे मोठे झाल्यावर मासेमारी करण्यात येत असत़े त्यामुळे याची व्याप्ती वाढविल्यास यातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आह़े वाढत्या तापमानामुळे तलावातील पाणी काहीसे कमी होत असले तरी, अद्याप तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे कधी घडले नाही़ त्यामुळे ग्रामस्थांना या गाव तलावाचा मोठा आसरा जाणवतो़