लोकमत न्यूज नेटवर्कखांडबारा : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे व्यापारासाठी येणाºयांना पाच दिवस गावबंदी करण्यात आली आहे़ एका व्यापाºयाच्या घरात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे़ ३१ जुलै ते ४ आॅगस्ट दरम्यान हा निर्णय लागू होणार आहे़खांडबारा ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे गावातील बाजारात होणारी गर्दी नियंत्रित होणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यास मदत होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावीत यांनी दिली आहे़ याबाबत आरोग्य विभागाकडूनही काही मार्गदर्शक सूचना व्यापाºयांना देण्यात आल्या आहेत़ सध्या खांडबारा गावात विविध कारणाने तसेच बाजारपेठेत येणाºया ग्रामस्थांना मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे याबाबत ग्रामपंचायतीने सक्त सूचना केल्या आहेत़ ग्रामपंचायत पदाधिकारी गावात जनजागृती करण्यावर भर देत आहेत़ खांडबारा येथील ग्रामस्थांनी घाबरुन न जाता कामाशिवाय घराबाहेर पडू नये, काम असल्यास मास्कचा वापर करावा असे सरपंच गुजराबाई गावीत, उपसरपंच शितल शिंदे, ग्रामविकास अधिकारी विजय अहिरे, सदस्य कैलास गावीत यांनी कळवले आहे़दरम्यान नंदुरबार येथून खांडबारा गावातील बाजारपेठेत दरदिवशी येणाºया व्यापाºयांची नोंद घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने कळवले आहे़ त्यानुसार सध्या कामकाज सुरू आहे़
खांडबाऱ्यात व्यापाऱ्यांना गावबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:49 IST