शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस व भाजपने शिवसेनेशी संपर्क साधला असून मुंबईतही काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री के.सी.पाडवी व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्याकडे अधिकृतपणे गटाची स्थापना केली.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालानंतर त्रिशंकु अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस व शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. गुरुवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही, परंतु संपर्क साधण्यात आले.सत्तेचे समिकरण बसविण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.भाजप नेते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी भाजप सत्ता स्थापनेसाठी भाजपचा प्रबळ दावा आहे. सेनेची साथ घेण्यास भाजप तयार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप पक्ष पदाधिकारी व सदस्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई येथे काँग्रेसचे नेते मंत्री अशोक चव्हाण व शिवसेना नेते संजय राऊत यांची बैठक झाल्याचे वृत्त असून पालकमंत्री के.सी.पाडवी हे देखील सक्रीय झाले आहेत. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी देखील शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. अद्याप शिवसेनेशी संपर्क साधला गेला नसल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य तथा माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत व मधूकर नाईक यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली. ही पारिवारीक भेट असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतर्फे रघुवंशी यांनी त्यांची भगवी शाल देत स्वागत केल्याने राजकीय चर्चेला अधीकच ऊत आला आहे. दरम्यान, नवनिर्वाचीत सदस्य तथा स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेबाबत वेगवेगळे समिकरण मांडले जात असल्याने हुडहूडी भरणाºया थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.शिवसेनतर्फे जिल्हाधिकाºयांकडे गटस्थापन करण्यात आला. भाजप व काँग्रेसतर्फे शुक्रवारी गट स्थापन केला जाणार असल्याचे समजते.