लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आचारसंहिता लागू होताच चारही मतदारसंघातील ङोंडे, बॅनर, जाहिराती, पोस्टर्स आणि कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणच्या 2,858, खाजगी ठिकाणच्या 1,141 व शासकीय ठिकाणच्या 145 एवढय़ा संख्येचा समावेश आहे. शासकीय मालमत्ता असलेल्या इमारतींच्या भिंतीवरील 120 ठिकाणचे संदेश पुसण्यात किंवा झाकण्यात आले आहेत. 193 पोस्टर्स, 557 जाहीरात फलकावरील संदेश आणि 271 बॅनर्स काढण्यात आले आहेत. ठिकठिकाणच्या शासकीय विकासकामांच्या कोनशिलादेखील झाकण्यात आल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणच्या इमारतींवरील 278 ठिकाणचे संदेश पुसण्यात आले आहेत. 448 भित्तीपत्रके, 1291 जाहीरात फलकावरील संदेश आणि 629 बॅनर्स काढण्यात आले आहेत. 212 ठिकाणचे विविध पक्ष आणि संघटनांचे ङोंडेदेखील काढण्यात आले आहेत.खाजगी जागांवरील 26 बॅनर्स, 52 जाहीरात फलकाचे संदेश आणि 46 भित्तीपत्रके काढण्यात आले आहेत. तर 21 भिंतींवरील संदेशही पुसण्यात आले आहेत. आचार संहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षातून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
Vidhan Sabha 2019: चार ठिकाणाचे बॅनर, जाहिराती, ङोंडे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 12:08 IST