लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूकीसाठी पारदर्शी व निर्भिडपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सर्वप्रकारची काळजी घेऊन पोलीस दलाने उपाययोजना केल्या आहेत़ त्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली असून तपासणी नाकेही सुरु केले आहेत़ आवश्यक असलेल्या 667 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून कायदा हातात घेणा:यांची गय केली जाणार नाही़ असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला़ विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्याशी झालेला संवाद असा़ प्रश्न : कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलाच्या उपाययोजना काय?महेंद्र पंडीत : निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने सर्व बाबींचा विचार करुन सूक्ष्म नियोजन केले आह़े त्यासाठी गेल्या निवडणूकांमध्ये अशांतता निर्माण करणारे तसेच विविध गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या 667 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आह़े 16 ठिकाणी तपासणी नाके कार्यन्वित करण्यात आले आहेत़ विविध पातळ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आह़े गुन्हेगारी पाश्र्वभूमी व संशयित लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष केंद्रीत करण्यात आले आह़े निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एक पोलीस उपअधिक्षक दर्जाचा अधिकारी तसेच 15 कर्मचा:यांचा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आह़े बंदोबस्ताचे नियोजनही सूक्ष्म पद्धतीने करण्यात आले असून जादा फोर्स मिळावा यासाठी मागणी केली आह़े प्रश्न: जिल्हा आंतरराज्य सिमेवर असल्याने त्यादृष्टीने उपाययोजना काय?महेंद्र पंडीत : हा जिल्हा मध्यप्रदेशातील बडवानी व अलीराजपूर तर गुजरातमधील तापी, नर्मदा आणि डांग या जिल्ह्यांच्या सिमेवर असल्याने त्यादृष्टीने सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व आवश्यक अधिका:यांची बॉर्डर मिटींग यापूर्वीच झाली आह़े तसेच संबधित यंत्रणेशी सातत्याने समन्वय ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने सर्व घटनांवर बारकाईने लक्ष राहणार आह़े अवैध दारु, शस्त्र याबाबतही कारवाई करण्यात येत आह़े प्रश्न : दुर्गम भागातील केंद्रांवर निर्भिड मतदानासाठी काय उपाययोजना आहेत?महेंद्र पंडीत : जिल्ह्यातील 48 गावातील 115 मतदान केंद्र हे दुर्गम व अतीदुर्गम भागात असल्याने त्यासाठी संपर्कासाठी पोलीस दलाने खास वायरलेस यंत्रणा कार्यान्वित केली आह़े त्याद्वारे या मतदान केंद्रांवर सातत्याने संपर्क राहणार असून आवश्यक त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन आह़े 9 मतदान केंद्रांवर बाजर्ने जावे लागणार असल्याने तेथेही सर्वप्रकारचे नियोजन करण्यात आले आह़े याशिवाय रेल्वेस्थानक तसेच वर्दळ असलेल्या ठिकाणांवर सर्व प्रकारचा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ व्हीआयपी नेत्यांच्या दौ:यातही त्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्यात येणार आह़े आपत्त्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व पातळ्यांवर उपाययोजना करता याव्या यादृष्टीने तयारी व प्रशिक्षण देण्यात आले आह़े सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आवश्यक साधनसामुग्रीही पुरवण्यात आली आह़े
विधानसभा निवडणूकीची निवडणूक प्रक्रिया शांततेत तसेच निर्भय व निष्पक्षपणे पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाने सवरेपरी उपाययोजना केल्या आहेत़ आंतरराज्य सिमेवरील नाकाबंदी, बॉर्डर बैठका, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नियंत्रणासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आह़े सर्वच बाबींवर सूक्ष्मपणे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आह़े