लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर मतदारसंघात पूर्वी भाजपकडून, नंतर राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेल्या माजी आमदार शरद गावीत यांची या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी जवळपास नसणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शरद गावीत अपक्ष लढतात की ऐनवेळी एखाद्या पक्षात प्रवेश करून त्यांच्या ङोंडय़ाखाली निवडणूक लढवितात याकडे लक्ष लागून आहे. नवापूर मतदारसंघात 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचा पराभव करून राज्याचे लक्ष आपल्याकडे वेधणारे माजी आमदार शरद गावीत हे यंदा कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवितात याकडे लक्ष लागून आहे. 2009 मध्ये समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीची साथ धरली होती. तर यंदा ते भाजपकडून इच्छूक होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली पुतणी डॉ.हिना गावीत यांच्यासाठी प्रय} केले. नवापूरची जबाबदारी शरद गावीत यांच्याकडेच देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना भाजपकडून तिकिटाची अपेक्षा होती. परंतु राजकीय घडामोडीत त्यांनी भाजप प्रवेश केला नाही. राष्ट्रवादीकडून जागा सुटण्याची अपेक्षा असतांना ही जागा काँग्रेसलाच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता अपक्ष किंवा युती न झाल्यास शिवसेना अथवा वंचीत आघाडी हा पर्याय आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे आता लक्ष लागून आहे.
Vidhan Sabha 2019: शरद गावीत यांच्या भुमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:07 IST