शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : आंतरराज्य 16 तर आंतर जिल्हा सिमेवर 10 ठिकाणी चेक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक काळात अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सिमेवर 16 तर आंतर जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणूक काळात अवैध मद्य व शस्त्र वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सिमेवर 16 तर आंतर जिल्हा सिमेवर 10 ठिकाणी तपासणी नाके राहणार आहेत. महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशच्या प्रशासकीय अधिका:यांच्या बॉर्डर मिटिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात बॉर्डर मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तापी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी कैलास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी भाऊसाहेब बच्छाव, तापी जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक ए.के.पटेल, डांग जिल्ह्याचे पोलीस उप अधीक्षक आर.डी.कावा उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, मतदानाच्या दोन दिवस पूर्वी जिल्ह्यात ड्राय डे असणार आहे. त्यावेळी शेजारील राज्यातील पोलीसांनी जिल्ह्याला जोडणा:या मार्गावर विशेष लक्ष द्यावे. महसूल, पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी एकत्रितपणे जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापना सील करतील. अवैध दारूची वाहतूक थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भरारी पथकात चांगली कामगिरी करणा:या अधिकारी-कर्मचा:यांचा सन्मान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सीमावर्ती भागातील जिल्ह्याच्या सहकार्याने निवडणूक चांगल्यारितीने पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार स्थिर सर्वेक्षण पथक आणि चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अवैध मद्य व शस्त्रांची वाहतूक रोखण्यासाठी आंतरराज्य सीमेवर 16 ठिकाणी तर आंतर जिल्हा सीमेवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. विविध गुन्ह्यातील फरार असलेल्या व्यक्तींची यादी शेजारील राज्यातील अधिका:यांना देण्यात येईल. या गुन्हेगारांची माहिती देण्याबाबत व सीमेवर नाकाबंदी करण्याबाबत गुजरात व मध्य प्रदेशच्या अधिका:यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.