शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात मोबाईलमध्ये चित्रीकरण करून युवतीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:58 IST

< p >नवापूर : मोबाईलमध्ये अल्पवयीन युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रण करून तिच्यावर दबाव टाकून तिघा युवकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची गंभीर व संतप्त घटना नवापूर येथे घडली. दरम्यान युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने नवापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत येथील चर्मकार समाजाने ...

<p>नवापूर : मोबाईलमध्ये अल्पवयीन युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रण करून तिच्यावर दबाव टाकून तिघा युवकांनी तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची गंभीर व संतप्त घटना नवापूर येथे घडली. दरम्यान युवतीने गळफास लावून आत्महत्या केल्याने नवापूर पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.याबाबत येथील चर्मकार समाजाने शाळकरी मुलींच्या हस्ते प्रशासनाला निषेधाचे निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येथील देवळफळी भागात राहणा:या 16 वर्षीय अल्पवयीन युवतीने 21 जुलै रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. अधिक तपासाअंती मयत युवतीस आत्महत्येला प्रवृत्त केले गेले. या अनुषंगाने पोलीसांनी मुलीच्या आईची फिर्याद दाखल करीत महेश पवार, जावेद मुनाफ शेख व आरीफ शेख (घडीयाली) यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण व सुरक्षा अधिनियम कलम 12, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम व इतर कलमान्वये 26 रोजी रात्री गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक केली. दरम्यान, मुलीने आत्महत्या करण्याआधी आरोपींनी संगनमत करून युवतीचे आक्षेपार्ह फोटो व छायाचित्रण मोबाईल मध्ये करून तीची फसवणूक करीत शारीरिक व मानसिक रित्या त्रास दिला. हा त्रास असह्य झाला व समाजात बदनामी होईल ह्या भितीने युवतीने आत्महत्या केली होती. नवापूर पोलिसांनी बारकाईने तपास करीत घटना उघडकीस आणून आरोपींना गजाआड केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनीही भेट देऊन तपास व गुन्ह्याची माहिती घेतली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.संत रोहिदास चर्मकार समाज विकास संस्था व राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे  तहसिलदार व पोलिस निरीक्षकांना घटनेच्या निषेधार्थ शाळकरी मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.  निवेदनावर माजी नगराध्यक्ष दामु बिराडे, नगरसेवक विशाल सांगळे, मनोहर नगराळे, समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, भगवान अहिरे, रतिलाल अहिरे, उखडु झांझर, जितेंद्र अहिरे, विजय ठाकरे, जयेंद्र चव्हाण, तुकाराम अहिरे, नथ्थु अहिरे, मधु अहिरे, वामन अहिरे, छोटालाल चव्हाण, राजाराम ठाकरे आदींच्या सह्या आहेत.