लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातून उपसा केलेली वाळू जिल्हा हद्दीतून वाहून नेण्यास जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी बंदी घातली होती़ या बंदीनंतरही वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू असून नंदुरबार तालुक्यात २६ जून ते ७ जुलै यादरम्यान ३८ वाहनांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़दरम्यान २७ जून रोजी वाळू वाहून नेणारे सात ट्रक तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ताब्यात घेतले होते़ या ट्रक चालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करून ट्रक जप्त करण्यात आले़ २८ रोजी एक तर २९ जून रोजी १५ वाहनांवर कारवाई करण्यात आली़ पाच व सात जुलै रोजी सात वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ सर्व वाहनातील वाळूही जप्त करण्यात आली आहे़
वाळू वाहणारी वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:42 IST