शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

जिल्हाभरात झाला रानभाज्या महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार आणि प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्यावतीने कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार आणि प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्यावतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी.भागेश्वर आदी उपस्थित होते. रानभाज्या योग्य ब्रँडींग आणि मार्केटींग करून शहरी भागात पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.गावीत यांनी यावेळी सांगितले. रानभाज्या महोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमात सातत्य ठेवावे आणि अधिकाधीक नागरिकांपर्यंत या भाज्यांचे महत्व पोहोचवावे असे आमदार नाईक यांनी सांगितले. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.बी. खरबडे, विभागीय विस्तार केंद्र प्रमुख एम. एस.महाजन, उद्यान विद्या विभागाचे प्रा. श्रीधर देसले यांनी रानभाज्यांविषयी माहिती दिली.जिल्ह्यातील इतर तालुक्यातही रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार दौऱ्यादरम्यान आदिवासी दिनानिमित्त ९ आॅगस्ट रोजी राज्यभरात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली होती. रानभाज्यांचे महत्व शहरी भागात पोहोचावे आणि आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.४महोत्सवात नवापूर व नंदुरबार तालुका व स्थानिक परिसरातील कपाळ फोडी , भुई आवळा, सायफळ, रक्त रोडा, पाथरी, नाळी भाजी, कटोर्ले, कोंबडा, वाया, डोहली फुले, आघाडा, तरोटा भाजी, डोमली, चुचा भाजी, डोड सिरा भाजी, उखरडा भाजी, लायकोट, झील भाजी, फांग भाजी, लाल/पांढरी अंबाडी, तोंडली, माठला भाजी, रांनभोपला, रान अळूचे पान, मायाळू, घाटकोळ, तांदुळजा, बांबूचे कोंब, भोकर, कुहडी, केना, शतावरी, रान केली, तेरा भाजी आदी रानभाज्यांचा समावेश होता.