के.डी. गावित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, कोरिट.
कोरिट, ता.नंदुरबार येथील के.डी. गावित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच अनिता भिल तर जिल्हा परिषद शाळेत वसंत भिल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सर्कल राहुल देवरे, तलाठी जयेश राऊळ, ग्रामसेवक अप्पासाहेब देसले, माजी पोलीस पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दगडू पाटील, विमलाबाई ठाकरे, विविध संस्थांचे पदाधिकारी, वासुदेव भिल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील होते. कार्यक्रमासाठी एस.एन. पाटील, एम.बी. पाटील, पी.एस. पाटील, एस.पी. ओगले, आर.पी. सोनवणे, प्राथमिक मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सविता पाटील, ज्योत्सना पाटील, सुनंदा पाटील, ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सुनील खाडे, प्रा.भरत चव्हाण उपस्थित होते. यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन एस.व्ही. विसपुते तर आभार व्ही.डी. पाटील यांनी मानले.
महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार शहरातील महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक एस.ए. मंगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर उपशिक्षक डी.बी. पावरा यांनी तंबाखूमुक्त अभियानाची शपथ घेतली. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एस.ई. निकुंबे यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, कर्मचारी, वसतिगृहाचे अधीक्षक व अधीक्षिकांसह कर्मचारी उपस्थित होते.
श्रीराम कर्णकार निवासी मतिमंद विद्यालय, नंदुरबार.
नंदुरबार येथील श्रीराम कर्णकार निवासी मतिमंद विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी कल्याणेश्वर मंदिराचे महंत नरेंद्र महाराज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास धनराज मराठे, बी.बी. पाटील, डी.आर. मराठे, डी.एल. पाटील, राजू पाटील, शीतल पटेल, भालचंद्र पाटील, किरण पाटील, संतोष पाटील, रवींद्र पाटील, गौतम गवळे, रविराज पाटील, सुरेशसिंग गिरासे, योगिता पाटील, आशाबाई मालचे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देवीदास पाटील यांनी केले.