शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जिल्ह्यात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST

शहादा येथील जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. ...

शहादा येथील जीवन साधना विद्या प्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कोविडच्या नियमावलीचे पालन करून घेण्यात आला. प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सरला पाटील होत्या. या कार्यक्रमात परिसरातील आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात बामखेडाचे सरपंच साधना पाटील, उपसरपंच रमण सोनवणे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुमन निकुम, ग्रामपंचायत सदस्या निर्मला निकुम, मीना निकुम, आशा पर्यवेक्षक, बिलाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सरला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वंदना पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शारदा कन्या विद्यालय, शहादा

शहादा येथील शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस.झेड. सैय्यद होत्या. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या वेळी उपशिक्षिका जे.एफ. गावीत, पी.के. कलाल यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एस.एस. मोरे तर आभार के.एस. पवार यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक एस.बी. मोरे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

विसरवाडी

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे आश्रय दुर्ग संस्था व बहुउद्देशीय बिरसा मुंडा आदिवासी सेवा संस्था यांच्या वतीने प्रियदर्शिनी ट्रेंनिंग सेन्टरमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रारंभी जागतिक महिला दिवसाची सुरुवात करणाऱ्या क्लारा झेटकिन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तालुक्यातील महिला बचत गटाच्या सदस्यांकरिता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. नवापूर परिसरातील बचत गटाच्या सदस्या व साई कॉम्पिटिशन अकॅडेमीच्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात भाग घेतला. याप्रसंगी नरेंद्र वसावे यांनी शिक्षणाचे महत्व व त्याकडून महिलांना होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमू गावीत, विक्रम गावीत, महिला बचत गट सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

के.डी. गावीत विद्यालय, इसाईनगर

नंदुरबार तालुक्यातील इसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.डी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षक ए.डी. खेडकर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शिक्षक बी.जे. जावरे, एम.आर. वसावे, एम.व्ही. वसावे, ए.टी. नाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.व्ही. विसपुते तर आभार प्रा.एस.आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी सी.डी. जाधव, एम.डी. पेटकर, आर.एस. पाडवी यांनी परिश्रम घेतले.

भरारी पुरस्कार वितरण कार्यक्रम

नंदुरबार : नवनिर्माण सर्व समाज संस्था व महा एनजीओ फेडरेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुना पंत यांनी सांगितले की, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, प्रत्येक स्त्रीने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, असे आवाहन जागतिक महिला दिनाच्या निमित्त भरारी पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.

या वेळी पोलीस निरीक्षक नयना देवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी, नवनिर्माण संस्थेच्या सचिव मनीषा गोसावी, मीनाक्षी कदम, नितीन मंडलिक आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील लतिका राजपूत, योगिनी खानोलकर, मालती वळवी, भारती पवार, डॉ.शहेनाज पठाण, मीनाक्षी गिरी, वंदना तोरवणे, अश्विनी करंके, पल्लवी प्रकाश, वृषाली नांद्रे, प्रतिभा पवार, बबिता पाडवी, निशा कासार व शिल्पा कासार, विठाबाई जाधव, दीपमाला पाटील, नीलिमा माळी, रोमाना पिंजारी या महिलांना पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना देवरे व जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनीही पुरस्कारप्राप्त महिलांचे कौतुक केले. सूत्रसंचालन रणजीत राजपूत यांनी केले. प्रास्ताविक रवी गोसावी यांनी केले. आभार प्रा.डॉ.माधव कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय दळवी, दिलीप पावरा, भूमिका भगत, शीतल शाक्य आदींनी परिश्रम घेतले.