शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुख्यमंत्री दत्तक गावअंतर्गत नंदुरबारात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 13:13 IST

13 गावांचा समावेश : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

नंदुरबार : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील 13 दत्तक गावांमध्ये लोकसहभाग आणि शासन समन्वयातून गावाचे पर्वितन होत आहे. जल, जंगल, जमीन संवर्धनासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाचा :हास होत असून, भविष्यात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. कु:हाड बंदीचा निर्णय घेवून ग्रामस्थांनी आदर्श निर्माण करावा या बरोबर जिल्ह्यात परिवर्तनाची नांदी ठरणारे भादवड गाव विकासाचे             मॉडेल ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 13 दत्तक गावांचे सरपंच आणि ग्राम परिवर्तक यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भादवड गावात वृक्षारोपणासह निसर्ग संवर्धन संकल्प उपक्रमाचे आयोजन करण्यात         आले. या वेळी भादवड ग्रामस्थांतर्फे सर्व प्रथम मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान स्वागत फलकाचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या बरोबरच निसर्गाचे सहकार्य म्हणून असलेले गाय, बैल, शेळी, कोंबडी या पशु प्राण्यांचेदेखील पर्यावरण दिनानिमित्त पूजन करण्यात आले. त्यानंतर गावाच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण अधिकारी जे.एस. जेजुरकर, आर.बी. पवार, जे.डी. शेख, परिवर्तन अभियानाच्या जिल्हा समन्वयक योगिनी खानोलकर, भादवड सरपंच संजय वळवी, ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.या वेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, शासनाच्या शेकडो योजना आहे. प्रशासन यासाठी प्रय} करीत आहे. परंतु ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी पुढे येणे गरजेचे आहे. भादवड गावात जलयुक्त शिवार प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. याचबरोबर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लवकरच नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्तीतून व्यसनमुक्त जिल्हा करण्याचा प्रय}ी यशस्वी झाला असून, यात गावक:यांनीही सहभाग घ्यावा.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे वृक्षात रूपांतर होईर्पयत कुटुंबातील मुला-बाळांप्रमाणे त्यांचे संगोपन केल्यास फळा-फुलांसह शीतल छाया मिळेल, असे डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले.याप्रसंगी राडीकलमचे सरपंच शंकर पावरा यांनी सांगितले की, आम्ही गावात बैठक घेवून कु:हाड बंदीचा निर्णय घेतला. राळेगणसिद्धी गावाला भेट दिल्यानंतर आपलेही गाव आदर्श गांव म्हणून निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय जिल्ह्यात वृक्षतोड करणा:यास प्रशासनातर्फे शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी पावरा यांनी केली. याच कार्यक्रात जिल्हाधिका:यांनी ग्रामस्थांना निसर्ग संवर्धन करण्याबाबत शपथ दिली.कार्यक्रमास खांडबारा, ता.धडगाव येथील सरपंच कुवलीबाई पाडवी, बोरवणच्या हिना पावरा, निंबोणीचे रतन वळवी, डेब्रामाळचे वनकर वळवी तर ग्रामप्रवर्तक राडीकलामचे दीपक पवार, बोरणचे गिरधन पावरा, बिजगावच्या जयश्री सपकाळे, चिखलीचे पंकज ठाकरे, बोरचकचे संदीप जावरे, निंबोणीचे नीतेश वसावे, डेब्रामाळचे अंकीत पाडवी, कल्पेश पाडवी, खरवडचे कृष्णा सताळे, चोंदवळेचे प्रितेश पाटील, वाटवीचे नीतेश पाटील, भादवडचे अविनाश पाटील आदी उपस्थित होते.प्रास्ताविक ग्रामसेवक अशोक सूर्यवंशी यांनी केले. भादवड गावात विविध प्रजातीची सुमारे एक हजार वृक्ष लावण्याचा मानस आहे. गावातील वृक्ष लागवड, जतन करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र दौड यांनी केले.