महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, नंदुरबार
नंदुरबार येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.ए. मंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आय.डी. पावरा, वरिष्ठ लिपिक एस.एस. भामरे, ग्रंथपाल एम.के.पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एस.बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन यू.पी. पाटील, तर आभार एम.एस. धनगर यांंनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
एम.के.रघुवंशी विद्यालय, आसाणे
आसाणे, ता.नंदुरबार येथील एम.के. रघुवंशी माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक एस.पी. मिरत्री यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. प्रास्ताविक एम.एफ. शेलार व विद्यार्थी मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी केले. प्रारंभी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या जयंतीनिमित्ताने १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा करत असताना, आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर जाऊन अध्यापनाचे कामकाज केले. विद्यार्थी मुख्याध्यापक राहुल पाटील व शिक्षक-शिक्षकेची भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाविषयी मनोगत व्यक्त केले. यानंतर के.पी. भामरे, एम.एफ. शेलार, एल.एच. धनगर, व्ही.एम. बागुल, पी.व्ही. भदाणे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. मिस्त्री यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी ए.एन. पाटील, आर.के. पाटील, के.के. पाटील, एस.यू. नाईक, डी.डी. पाटील उपस्थित होते.