नंदुरबार : येथील अभिनव विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करून शिक्षकदिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील होते, प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी हेतल पाटील, गायत्री पाटील आणि शरद माळी या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त विचार मांडून कोरोना काळात शिक्षकांनी केलेल्या कार्यावर विचार व्यक्त केले. प्रमुख वक्ता म्हणून राजीव संगपाळ उपस्थित होते. सूत्रसंचालन राजश्री गावित, तर आभार हरिष जाधव यांनी मानले.
के. डी. गावित विद्यालय, देवपूर
देवपूर, ता. नंदुरबार येथील के. डी. गावित माध्यमिक विद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावली. याप्रसंगी मुख्याध्यापक म्हणून दिव्या गोकुळ वसावे हिने जबाबदारी पार पाडली. तिच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दिवसभर त्यांना आलेल्या अध्यापनाचे अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना पेन भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मनोहर साळुंके, मीनाक्षी व्यास, हेमांगी पाटील, मनोज सूर्यवंशी, सुनील पाटील, संजय महाजन, उदय पाटील, नूतन पाडवी, माधुरी साठे, अतुल गावित, कन्हैयालाल पाटील, कन्हैयालाल धनगर, राकेश पाटील यांनी परिश्रम घेतले.
कुबेर विद्यालय, म्हसावद
म्हसावद, ता. शहादा येथील कुबेर विद्यालयात ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक मनोज अशोक पाटील यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक प्रा. पी. एम. पटेल, ज्येष्ठ शिक्षक व्ही. डी. सूर्यवंशी, माधुरी पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रवीण देसले, रेखा पटेल, सातपुडा छात्रालय अधीक्षक चंद्रकांत पाटील यांनीही अभिवादन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.