मोलगी : अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथे उपसरपंच तथा माजी विद्यार्थी कृष्णा वसावे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
कार्यक्रमास सुनील रहासे, राजेश जैन, रामजी पाडवी, अशोक पटेल, नामदेव तडवी, राकेश जैन, विपुल लाहोटी, नरसिंग वळवी, संदीप तडवी, संदीप ढोले, सोमनाथ ढोले, पंडित ताराचंद तावडे, आपसिंग वसावे, राहुल बोरदे, दामा वसावे, दादा सोनार, राजू वसावे, रवींद्र वसावे, मुख्याध्यापक दिलीप नगराळे, नटवर तडवी, राहुल पाटील, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. उदय गावीत यांनी तंबाखूविरोधी शपथ सर्व कर्मचारी, विद्यार्थी व उपस्थितांना दिली. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
गावीत विद्यालय, देवपूर
नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील के. डी. गावीत माध्यमिक विद्यालयात माजी आमदार शरद गावीत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास जि.प. सदस्या विजया गावीत, सरपंच पंकज गावीत, उपसरपंच रवींद्र पाडवी, मुख्याध्यापक मनोहर साळुंके, भूपेंद्र आभणे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संजय महाजन यांनी तंबाखूमुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमासाठी मीनाक्षी व्यास, हेमांगी पाटील, मनोजकुमार सूर्यवंशी, सुनील पाटील, उदय पाटील, नूतन पाडवी, माधुरी साठे, अतुल गावीत, कन्हैयालाल पाटील, कन्हैयालाल धनगर, राकेश पाटील उपस्थित होते.
कोरीट
नंदुरबार तालुक्यातील कोरीट येथील के. डी. गावीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सरपंच अनिताबाई देवीदास भिल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमास मंडल अधिकारी राहुल देवरे, तलाठी जयेश राऊळ, ग्रामसेवक देसले, माजी पोलीसपाटील गणेश पाटील, ग्रा. पं. सदस्य दगडू पाटील, विमलाबाई गीमा ठाकरे, विविध संस्थांचे पदाधिकारी वासुदेव भिल, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरीट जि. प. शाळेत वसंत भिल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी के. डी. गावीत, विद्यालयाचे प्राचार्य मुकेश पाटील होते. यावेळी शहीद जवान, राजकीय नेते, क्रीडापटू, कोरीट गावातील माजी सरपंच देवीदास भिल व गावीत विद्यालयातील शिक्षक प्रशांत भाईदास पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य मुकेश पाटील यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान, स्वातंत्र्यसेनानी यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन एस. व्ही. विसपुते यांनी केले. आभार व्ही. डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस. एन. पाटील, व्ही. एस. पाटील, एम. बी. पाटील, पी. एस. पाटील, एस. पी. ओगले, मुख्याध्यापक शशिकांत पाटील, सविता पाटील, ज्योत्स्ना पाटील, प्रा. सुनील खाडे, प्रा. भरत चव्हाण व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.