प्रारंभी संस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर चौधरी यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्राचार्या डी.बी. अलेक्झांडर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी गोटुसिंग वळवी, ईश्वर वसावे, राखी लष्करी, पुजा लोहार, दामीनी परदेशी यांनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री अलेक्झांडर उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन चौधरी, सचिव मनोज चौधरी व पालक सुनील साळवे, दिलीप जैन, अनिल जैन, प्रा.मनोज मुधोळकर, मुकेश दिघे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षक फरीदा शेख, पुजा मराठे तसेच विक्की कुंभार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गोटुसिंग वळवी यांनी केले.
जन शिक्षण संस्थान नंदुरबारतर्फे अभिवादन
नंदुरबार येथील जनशिक्षण संस्था नंदुरबार एकतर्फे विश्व आदिवासी दिन तथा क्रांती दिन व अमृत महोत्सवा निमित्ताने अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जन शिक्षण संस्थांचे चेअरमन केदारनाथ कवडीवाले उपस्थित होते. तसेच व्हा.चेअरमन गिरिष बडगुजर, सुरेश पाटील, रोहिदास पाटील, पंढरीनाथ माळी तसेच जन शिक्षण संस्थांचे ३० प्रशिक्षणार्थीसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक बाबुलाल माळी यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्ताने संपूर्ण देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त आदिवासी क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा देवून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन लेखाधिकारी शरद जोशी तर आभार कल्पेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी राहुल चव्हाण, अनुराधा मोरे यांनी सहकार्य केले.
एकलव्य आदिवासी युवा संघटना, नंदुरबार
एकलव्य आदिवासी युवा संघटनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि फलक अनावरण करण्यात आले. या वेळी कुलदैवत देव मोगरा माता व आदिवासी क्रांतीकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गुलाब नाईक, इंजिनीयर किरण तडवी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, उपाध्यक्ष राकेश जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष दीपा वळवी, शहराध्यक्ष गणेश सोनवणे, महिला शहराध्यक्ष सोनल ठाकरे, बीटीपी प्रमुख धनेश ठाकरे, प्रदेश सचिव ईश्वर गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष दिनेश सोनवणे, निरंजन पवार, टी.एच. मोरे, यशवंत पवार, अजय भिल, सचिन फटकाळ आदी उपस्थित होते.
शहादा येथील महिला महाविद्यालयात व्याख्यान
शहादा येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई संलग्नित सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयातील मराठी व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व आदिवासी दिन आणि क्रांती दिनानिमित्त भूषण पाटील, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक चित्रकार मुंबई, यांचे ‘आदिवासी संस्कृती आणि लोककला’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले. व्याख्यानात त्यांनी आदिवासी संस्कृती आणि लोककला सर्वांसाठी अनुकरणीय असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोककला, इ. समजण्यासाठी आपण आदिवासी पाड्यात गेले पाहिजे. आदिवासींचे निस्वार्थी जीवन जवळून पाहिले पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगत असतांना ते निसर्गाला दैवत मानतात. शहरातील सभ्य समाजापेक्षा आदिवासी समाजात एकत्र राहण्याची सामाजिक बांधिलकी नक्कीच प्रेरणादायी आहे.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सोपान बोराटे उपस्थित होते. या चर्चासत्राचे आयोजन मराठी व सांस्कृतिक विभागातील प्रा.मंगला चौधरी, प्रा.खेमराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मंगला चौधरी यांनी केले तर आभार प्रा.खेमराज पाटील यांनी मानले.
संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील, व्हा. चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए.के. पटेल, संचालक अभिजित पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्या प्रीती पाटील, वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.शांताराम बडगुजर व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
ऑनलाईन चर्चासत्रासाठी प्र. प्राचार्य डॉ.कैलास चव्हाण, प्रा.काकासाहेब अनपट, प्रा.मंगला पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा.योगेश भुसारे, प्रा.देवचंद पाडवी व प्रा.डॉ.जयेश गाळणकर, प्रा.रवींद्र खेडकर, प्रा.दीपिका पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.