लायन्स क्लब, नंदुरबार
नंदुरबार येथील लायन्स क्लबच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त लायन्स क्लबमधील गुरुजनांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी क्लब अध्यक्ष शेखर कोतवाल यांनी मनोगतात क्लबमधील गुरुजनांच्या समाजकार्याचे व आपल्या क्षेत्रातील योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. क्लबमधील डॉ.सुहास भावसार, डॉ.महेंद्र एस. रघुवंशी, डॉ.महेंद्र जे. रघुवंशी, चंदर मंगलानी, शंकर रंगलानी, उद्धव तांबोळी, दिनेश वाडेकर, अश्विन पाटील, श्रीराम दाऊतखाणे, श्रीराम मोडक, राहुल पाटील या सर्व गुरुजनांचा क्लबच्या वतीने अध्यक्ष शेखर कोतवाल, हितेंद्र शाह, राजेंद्र माहेश्वरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रोजेक्ट चेअरमन निमेश गोसलिया होते.
वल्लभ विद्या मंदिर, पाडळदा
वल्लभ विद्या मंदिर पाडळदे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा प्रतिमेचे पर्यवेक्षक आंबालाल चौधरी, शांतीलाल बागले, सुनंदा पाटील, दिव्या पाटील, मनीषा दाभाडे, नलिनी पाटील, चतुर पाटील, महेंद्र पाटील यांनी पूजन केले. शिक्षक दिनानिमित्ताने आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिपाई यांची भूमिका पार पाडली. यावेळी विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापिका कल्याणी पाटील, पर्यवेक्षक प्रणाली पाटील, शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमधून नम्रता पाटील, आकांक्षा पाटील, पल्लवी बच्छाव, युगल पाटील, पलक पाटील, जयश्री कोळी, कृतिका पाटील, कल्पेश सोनार, गौरव कोळी, नीलेश पाटील, हिमांशू मिस्त्री, लोकेश कोळी, आदेश ईशी, हिमांशू गुरव, शिपाई म्हणून राकेश सूर्यवंशी, देवेंद्र कोळी, तेजस कोळी यांनी काम पाहिले. यानंतर विद्यार्थी शिक्षक-शिक्षका नेहा पाटील, पलक गिरासे, दिशा पवार, पुष्पदंत मिस्तरी, हेमंत सोनार, पल्लवी बच्छाव, पलक पाटील, युगल पाटील, आदेश ईशी, नम्रता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांमधून महेंद्र पटेल, चतुर पाटील, मनीषा दाभाडे, दिव्या पाटील, भरत पाटील, पर्यवेक्षक अंबालाल चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा पाटील यांनी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक चतुर पाटील व मनीषा दाभाडे यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी शिक्षकदिनी योगेश सोनार, नलिनी पाटील, अमोल पाटील यांचा सत्कार केला. योगेश सोनार व अमोल सोनार यांनी मुख्याध्यापिका सुनंदा पाटील यांचा सत्कार केला. पाचवी ते सातवीच्या मुलींनी शाळा उघडण्यासाठी गीत सादर केले. कार्यक्रमासाठी धर्मेंद्र कुवर, राजू वसावे, विश्राम पाटील, गोपाल विसावे, कर्मचारी विनोद गोसावी, वैभव पाटील यांनी परिश्रम घेतले.