शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST

मोलगी, ता.अक्कलकुवा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद कोळी, पर्यवेक्षक आर. के. ...

मोलगी, ता.अक्कलकुवा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद कोळी, पर्यवेक्षक आर. के. वसावे यांनी महर्षी व्यासमुनी व सरस्वती मातेचा प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी शिक्षक व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, टोकरतळे

नंदुबार तालुक्यातील टोकरतळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांनी गुरुपौर्णिमानिमित्त विद्यार्थिनींना ऑनलाइन मार्गदर्शन केले. या वेळी आपले आई-वडील पहिले गुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका शोभा शर्मा, एल. आर. पाटील, भावना सोनवणे, कल्याणी पाटील, ललिता पाटील, शालिनी पाटील, मीना पाटील, पद्मा परदेशी, स्मिता चव्हाण, जयश्री सुगंधी, सुनीता सामुद्रे, ललिता शिंदे, विजया पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कला शिक्षिका सुनीता भारती यांनी केले.

साईबाबा मंदिर, म्हसावद

म्हसावद, ता. शहादा येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुर्पौर्णिमानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी श्रीमद‌् भागवत कथेचे आयोजन केले जाते. मात्र, दोन वर्षांपासून कोविडच्या पार्श्वभूमीवर फक्त पारायण केले जात आहे. पारायणकार वसंत कुलकर्णी यांनी पारायण केले. याप्रसंगी साईबाबा भक्त मंडळाचे संचालक माधव शंकर पाटील यांच्या हस्ते सपत्निक अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल हिरजी चौधरी, उपाध्यक्ष धारू सदाशिव पाटील, सचिव गणेश नरोत्तम पाटील, संचालक मंडळ उपस्थित होते.

काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार

नंदुरबार येथील काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्व, गोष्ट सांगणे व गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम जान्हवी अरूण कामडे, द्वितीय पूर्वा राहुल गाभणे, तृतीय सांची समीर कुलकर्णी, तर उत्तेजनार्थ नंदिनी किसन गवळी आली. गोष्ट सांगणे स्पर्धेत प्रथम दुर्वा नंदलाल चौधरी, द्वितीय विभागून जान्हवी सुनील भोई व भूमी किशोर पवार, तृतीय विभागून स्वरा रामचंद्र साळी व प्राप्ती महेश भट तर उत्तेजनार्थ दिशा धनंजय पाटील आली. तसेच गीतगायन स्पर्धेत प्रथम साक्षी नरेंद्र जाधव, द्वितीय खुशी लक्ष्मण बोरसे, तृतीय देवयानी रतन बडगुजर आली.

या स्पर्धांचे परीक्षण महेश भट, किसन पावरा व सुधाकर पाटील यांनी केले.

याप्रसंगी महेश भट यांनी विद्यार्थिनींना आपल्या जीवनात गुरुंचे महत्त्व या विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले.

यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक विपूल दिवाण, सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी यांनी कौतुक केले.