शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने शहाद्यात वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात अज्ञात व्यक्ती पायी जात असताना शहाद्याहून खेतियाकडे जाणाऱ्या एका ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात अज्ञात व्यक्ती पायी जात असताना शहाद्याहून खेतियाकडे जाणाऱ्या एका ४०७ वाहनाने पादचारीस जोरदार धडक देऊन फरार झाला. घटनेनंतर तासाभरातही १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संबंधित इसमाचा जागीच मृत्यू झाला.याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहाद्याहून घराकडे निघालेल्या सुरप्या धनजी वाघ (६२) (मूळगाव इस्लामपूर, ह.मु.कलसाडी, ता.शहादा) हे शहादा शहरातून आपल्या सासुरवाडीला कलसाडी येथे जात असताना खेतिया रस्त्यावरील अश्फाक उल्लाखान चौकात मागून आलेल्या एका अज्ञात ४०७ वाहनाने धडक दिल्याने सुरप्या वाघ गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर नागरिक जमा झाले. त्यातील आनंद शेवाळे यांनी आरोग्य विभागाच्या १०८ या रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु तासाभरानंतर ही रुग्णवाहिका घटनास्थळी न आल्याने सुरप्या वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाघ यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अज्ञात वाहन चालक रात्री उशिरा स्वत: पोलीस ठाण्यात वाहनासह दाखल झाला. शहादा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.