अध्यक्षस्थानी तहसीलदार गिरीश वखारे, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, गौसिया मस्जिदचे इमाम हाफिझ खालिद चिस्ती, जामा मस्जिदचे इमाम मोलाना शोएब रझा नुरी आदी उपस्थित होते. अफवांना बळी न पडता जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वखारे यांनी केले.
डॉ. चव्हाण म्हणाले की, आज तळोदा शहरात करोनाचा एकही रुग्ण नाही, ही समाधानाची बाब आहे. याचा अर्थ आपण गाफील झालो आहोत, असाही नाही, तर आपल्याला सतर्क राहून काळजी घ्यावी लागेल. यासाठी लसीकरण करून घ्यावे व कोरोना नियम पाळावेत, असे त्यांनी सांगितले.
शिबिरात ९३ जणांचे लसीकरण करण्यात आले. शिबिरासाठी मुस्लिम समाज अध्यक्ष आरीफ शेख नुरा, नगरसेवक अमानोद्दीन शेख, माजी नगरसेवक कलीम अन्सारी, मतीन शेख, इम्रानअली निसारअली, सिद्दिकीया मस्जिदचे सचिव सुलतान अब्दुल गनी, पत्रकार अक्रम पिंजारी, गौसिया मस्जिदचे उपाध्यक्ष हाजी अकील अन्सारी, लेखापाल बबलू महुवाले, सदस्य नासीर मिस्त्री, अझहर शेख, जमील पिंजारी, रशीद अन्सारी, महेमूद कुरेशी, ॲड. महेबूब मन्सुरी, शोएब बागवान आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन खाटीक यांनी केले.