शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ग्रामपंचायत व शिक्षण विभागाच्या सहकार्याने रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या १८ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला भगिनींसाठी विशेष मोहिमेंतर्गत १०० महिला व १०० पुरुषांना वेगवेगळे विभाग करून लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्रांवर पहाटेपासूनच गर्दी असते. कर्मचारी व लाभार्थ्यांमध्ये शाब्दिक वाद-विवाद ही होतात. परंतु सारंगखेडा येथील आरोग्य, ग्रामपंचायत व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त मोहिमेमुळे व नियोजनामुळे टोकन पद्धतीने लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, औषध निर्माण अधिकारी सी.एम. पाटील, आरोग्य सेविका वैशाली सांगळे, ग्रा.पं. सदस्य संतोष मोरे, लव्हा भिल, तिरसिंग भिल, श्रीराम भिल, राजेंद्र बोरुडे, गुड्डू भील, प्रवीण कोळी आदींसह आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेसाठी सहकार्य केले.
सारंगखेडा येथे लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST