शिबिराचे उद्घाटन सरपंच कल्पना वळवी यांनी लस घेऊन केले. नवापूर पंचायत समितीचे सभापती रतिलाल कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, उपसरपंच रमेश गावित, पोलीस पाटील कांतिलाल नाईक, केंद्रप्रमुख पंडित एंडाईत, जीवन विकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भामरे, प्राथमिक मुख्याध्यापक मोहनसिंग वळवी, किसन वसावे, भिका मोरे, तलाठी मोतीराम गावित, ग्रामसेवक रिना वळवी, डोगेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वळवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष वळवी, डॉ. राकेश वळवी उपस्थित होते. यावेळी पूर्व बोरचक येथे ३०३, वागदे येथे १०० व पश्चिम बोरचक येथे १९९ असे एकूण ६०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. २८ ते ३० मे दरम्यान हे लसीकरण शिबिर घेण्यात आले.
शिबिर यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक दिलीप बोधिले, प्रल्हाद वानखेडे, परिचारिका निर्मला मावची, आनंदी गावित, सुनंदा गावित, रिबिका गावित,भूपेंद्र वळवी यांनी परिश्रम घेतले.
तीन गावात सतत तीन दिवस सुरू असलेल्या लसीकरण शिबिरासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्व बोरचक, वागदे, जीवन विकास माध्यमिक विद्यालय बोरचक(पश्चिम),टीम ट्रस्ट प्राथमिक शाळा भोरचेक या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आशा मीनाक्षी वसावे, प्रतिभा पथक, सविता गावित, वंदना वसावे, अंगणवाडी सेविका सुनंदा पाडवी, लिना वळवी, अरुणा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश पाडवी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हिमांशू बोरसे यांनी तर आभार गुलाब चौधरी यांनी मानले.