यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पोसल्या कोकणी, पंचायत समिती सदस्य राजू कोकणी, सरपंच देसुबाई कोकणी, पोलीस पाटील आशा कोकणी, केंद्रप्रमुख सुरेश भदाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य फुलवंती कोकणी, दिलवरसिंग कोकणी, धनिल कोकणी, ग्रामसेवक आर.बी.नाईक, तलाठी आर.डी.गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र शिंदे, मुख्याध्यापक सतीश देवरे, बर्डीपाडा मुख्याध्यापक सतीश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ.तुषार वसावे, डॉ.सोनिया वसावे, जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा कर्मचारी, आरोग्यसेविका, मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर उपस्थित होते. आभार संदीप काकुस्ते यांनी केले. नवापूर गटशिक्षणाधिकारी आर.बी.चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. शिबिराला पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, गटविकास अधिकारी सी.के.माळी यांनी भेट देत माहिती घेतली.
मोग्राणी येथे ३७२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST