शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गोगापूरजवळील बंधारा ठरणार निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील गोगापूर ते लोहारे गावादरम्यान आडी-खापरी नदीवर असलेल्या साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी पाटय़ा ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील गोगापूर ते लोहारे गावादरम्यान आडी-खापरी नदीवर असलेल्या साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी पाटय़ा बसविण्यात न आल्याने पाणी वाहून जात आहे. या प्रकारामुळे शेतक:यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या बंधा:याच्या 14 लोखंडी पाटय़ा दुरुस्तीसाठी नेल्या आहेत. मात्र एक महिना उलटूनही पाणी अडविण्यासाठी पाटय़ा टाकण्यात न आल्याने पाणी वाहून जात आहे.सविस्तर वृत्त असे की, आडी-खापरी नदीवर साठवण बंधारा आहे. या बंधा:यातील पाण्याचा गोगापूर, दामळदा, तिधारे, लोहारे येथील शेतक:यांना शेती सिंचनासाठी उपयोग होतो. या धरणात अडवलेल्या पाण्यामुळे सुमारे 200 एकर शेतजमिनीला फायदा होतो. या वर्षी मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून या बंधा:याची दुरुस्ती झाली, असे शेतक:यांनी सांगितले. मात्र जुलै-ऑगस्टमध्ये या नदीला पूर आला व त्याचा फटका या बंधा:याला बसला. पुरामुळे पुन्हा गळती सुरू झाल्याने दुरुस्ती करणा:या संबंधित ठेकेदाराने साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी टाकाव्या लागणा:या 14 लोखंडी पाटय़ा दुरुस्तीसाठी नेल्या आहेत. मात्र अद्याप त्या दुरुस्त होऊन आल्या नाहीत. शेतक:यांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार फोन करून तक्रारही केली. मात्र आजच्या स्थितीला अजून पाटय़ा टाकलेल्या नाहीत. पावसाळा संपला, नदीचे सर्व पाणी वाहून चालले आहे. या बंधा:यात पाणीसाठा झाला नाही तर शेतक:यांना शेतीसाठी पाणी कुठून मिळणार? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांनी व्यक्त केल्या आहेत. गेल्या एक महिन्यापासून शेतकरी या बंधा:यात पाटय़ा टाकून पाणी अडविण्याची मागणी ठेकेदाराकडे करीत आहेत. मात्र ठेकेदाराने पाटय़ा टाकण्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालून बंधा:यात तातडीने पाटय़ा टाकून पाणी अडविण्याबाबत या ठेकेदाराला सक्त ताकीद द्यावी व पाटय़ा टाकण्यासाठी लागलेल्या विलंबाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काशीनाथ रामदास पाटील, भाऊराव गुलाब पाटील, अशोक खंडू पाटील, मोहन गोविंद पाटील, माणक सखाराम पाटील, गणेश रामदास ईशी, नारायण दशरथ पाटील, रघुनाथ दशरथ पाटील, सतीश माधव पाटील, गोटू दुल्लभ पाटील आदी शेतक:यांनी केली आहे.