शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नंदुरबारात वनपट्टे धारकांचा हळद लागवडीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:34 PM

लोकसमन्वयचा पुढाकार : जिल्हाधिका:यांच्या हस्ते शुभारंभ, शेतक:यांमध्ये कुतूहल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनपट्टे धारक व स.स.प्र. बधितांच्या शेतीत ठिबक आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. साधारणत: 50 एकरवर ठिबकच्या आधारावर लागवड करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील आमली या गावातील वनपट्टे धारक मिठय़ा नाईक व प्रकाश नाईक या शेतक:यांच्या शेतात जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांच्या हस्ते सिंचन आधारित हळद पीक लागवडीचा शुभारंभ झाला. वनपट्टे धारकांना पीककर्ज उपलब्ध होणे व आधुनिक तंत्रज्ञानासाठी कर्ज व कृषी विभागाकडून अनुदान उपलब्ध होणे ही जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेने स्टेट बँक ऑफ इंडिया, जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताई जैन मल्टिपर्पज फौंडेशन यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 50 शेतक:यांच्या शेतात हळद व 50 शेतक:यांच्या शेतात आंबा असे 100 शेतक:यांच्या शेतात ठिबक सिंचन आधारित हळद लागवड व आबा लागवडीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे. यासाठी पीक कर्ज अर्थसहाय्य रुपात स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी उपलबद्ध करून दिले आहे.  जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, प्रकाश नाईक यांनी लोकसमन्वयच्या साह्याने मागील वर्षी नरेगा मधून विहीर घेतली व ती पूर्ण करत ह्या वर्षी आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत ही बाब अतिशय भूषणावह आहे. जिल्ह्यातील सरदार सरोवर विस्थापित हातात हात घालून आधुनिक तंत्रज्ञान वापरत आपला विकास घडवत आहेत त्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीर उभे आहे. सर्व प्रकारची मदत करावयास कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी बोलताना दिली.एका बाजूला लोकसंघर्ष मोर्चाचा वनपट्टे अधिकाराचा लढा सुरूच आहे तर दुस:या बाजूला वनपट्टे मिळालेल्या दावेदारांच्या शेतात शासनाच्या योजना, पीककर्ज व आधुनिक शेतीसाठी अनुदान पोहचवणारा नंदुरबार पहिला जिल्हा ठरला आहे. त्याबाबत लोकसमन्वयचे संजय महाजन व सचिन धांडे, लोकसंघर्ष मोर्चाचे काथा वसावे यांनी शासनाचे आभार मानले.यावेळी जैन इरिगेशनचे बाळकृष्ण ब:हाटे, गोविंद पाटील, अमित ढमढेरे, स्टेटबँकेचे वानखेडे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख, लोकसमन्वयचे निशांत मगरे, देविदास वसावे, दीपाली पाटील, देवमोगरा पुनर्वसनचे सरपंच नरपत पाडवी, आमलीचे सरपंच भगतसिंग नाईक व शेकडो शेतकरी उपस्थित होते.