शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणा:या तरुणींची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तात्पुरत्या भाजी मार्केटमध्ये विक्री करणा:या विक्रेत्यांनी व खरेदी करायला येणा:या नागरिकांनी आपल्या चेह:यावर मास्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तात्पुरत्या भाजी मार्केटमध्ये विक्री करणा:या विक्रेत्यांनी व खरेदी करायला येणा:या नागरिकांनी आपल्या चेह:यावर मास्क लावा, अशी सूचना मुख्याधिकारी व पालिकेचे कर्मचारी करत असताना त्यांच्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका युवकासह दोन युवतींविरोधात  शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या वेळी जोरदार शाब्दीक चकमक झाल्याने परिसरात मोठा जमाव जमला होता. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व कर्मचारी अन्नपूर्णा लॉजशेजारील तात्पुरत्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहणीसाठी गेले असता तेथे काही विक्रेते व नागरिकांनी चेह:यावर मास्क लावले नव्हते.  यादरम्यान दोन युवतींनी मुख्याधिका:यांशी अचानक वाद घातला. दोन्ही बाजूने मोठी शाब्दिक चकमक उडाल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. संबंधित युवतीने फोन करून आपल्या भावाला व नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले होते. यामुळे प्रकरण हातघाईवर आले होते. याचदरम्यान पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व कर्मचा:यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणले.शहादा पोलिसात पालिकेचे कर्मचारी वसीम रफिक शेख यांच्या फिर्यादीवरून भरत प्रकाश चित्रकथे व दोन युवती अशा तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणला, साथरोग नियंत्रण अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करीत आहेत.दरम्यान, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दररोज सकाळी आठ ते बारा या कालावधीत प्रशासनातर्फे नागरिकांना संचारबंदीत शिथीलता देण्यात आली असली तरी याचा गैरफायदा काही हुल्लडबाज नागरिकांकडून घेतला जात असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे. त्यातच मास्क लावल्याशिवाय नागरिकांनी शहरात येऊ नये, अशा सूचना वारंवार पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या असल्या तरी याचे सर्रासपणे उल्लंघन शहरातील काही नागरिकांकडून होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.