दुपारी १२ वाजता सभेला प्रारंभ झाला. या सभेत प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीअंती विश्वास भीमराव बडोगे यांचे उपनगराध्यक्ष पदासाठीचे नामनिर्देशन वैध असल्याचे पीठासीन अधिकारी हेमलता पाटील यांनी जाहीर केले. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी नियमानुसार १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला असता. मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने नियमानुसार उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास बडोगे हे नवापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून पुढील कालावधीसाठी निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी जाहीर केले.
या विशेष सभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानून सभा संपल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आरिफ बलेसरिया यांनी ११ जानेवारी २०२१ रोजी राजीनामा दिलेला होता. नवापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी सभेस दिली होती. त्यानुसार मंगळवारी नवापूर नगर परिषदेच्या वीर एकलव्य सभागृहात पीठासन अधिकारी हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या उपस्थितीत सकाळी १२ वाजता विशेष सभेला सुरुवात करण्यात आली होती. सभेच्या विशेष सभेत आशिष मावची, आरीफ बलेसरिया, नरेंद्र नगराळे, हारुण खाटीक, रेणुका गावित, बबिता वसावे, मंजू गावित, विशाल सांगळे, खलील खाटीक, अरुणा पाटील, मिनल लोहार, महेंद्र दुसाणे, सुरय्याबी शाह, महिमा गावित, सुरेखा जगदाळे, बंटी चंदलाणी, यश अग्रवाल उपस्थित होते. या निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीय अधिकार अनिल सोनार, वरिष्ठ लिपिक अशोक साबळे यांनी पार पाडली.