शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्याची घरपट्टी माफचे झळकले विनापरवाना होर्डींग्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार पालिकेने सहा महिन्याची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतलेला नसतांना काही खोडसाळ मंडळींकडून अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पालिकेने सहा महिन्याची घरपट्टी माफ केल्याचा निर्णय घेतलेला नसतांना काही खोडसाळ मंडळींकडून अशा प्रकारचा निर्णय झाल्याची बॅनर व होर्डींग शहरात लावण्यात आले आहेत. जे कोणी असे होर्डींग लावले असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेची सभा दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन झाली. सभेत २१ विषय मंजुर करण्यात आले. सभेत पालिकेने सहा महिन्यांची घरपट्टी माफ केली किंवा असा प्रस्ताव विरोधकांच्या मागणीवरून मंजूर केला हे खोटे आहे. सभेच्या अजेंड्यावर तसा विषयच नव्हता. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ मधील तरतुदींमध्ये नगरपरिषदांना अशा प्रकारे घरपट्टी माफ करण्याचे अधिकार नाहीत. ही वस्तूस्थिती असतांना शहरात काही ठिकाणी पालिकेने भाजपच्या नगरसेवकांच्या मागणीवरून सहा महिन्यांसाठी घरपट्टी माफ केल्याच्या निर्णय झाल्याचा उल्लेख असलेले होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. वास्तविक असा निर्णयच झाला नाही आणि पालिकेला तो अधिकारच नसतांना नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही खोडसाळ मंडळींनी चालविला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा खोट्या माहितीला बळी पडू नये असे आवाहन करून जे कोणी अशा प्रकारचे होर्डींग्ज लावले असतील त्यांनी ते त्वरीत काढून घ्यावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. पालिकेच्या सभेत झालेले निर्णय  असे, कोरोनामुळे मालमत्तांचे जनरल रिव्हीजन करणे उचीत होणार नाही. त्यामुळे यंदा चतुर्थ वार्षिक अकारणी करण्यात येऊ नये. मालमत्ता धारकांना बील मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत थकबाकीसह संपुर्ण रक्कम भरल्यास त्यांना दहा टक्के सूट देण्यात येणार असे निर्णय झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.