शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात एड्सबाधीत जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एड्सबाधीत युवक-युवतींनी येथे आज सप्तपदी घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. निमित्त होते येथील डीवाय.एस.पी. पुंडलिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : एड्सबाधीत युवक-युवतींनी येथे आज सप्तपदी घेत साताजन्माच्या गाठी बांधल्या. निमित्त होते येथील डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे यांच्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याच्या उपक्रमाचे. गेल्या 10 वर्षापासून ते असा उपक्रम राबवीत आहेत. आजच्या या विवाह सोहळ्यात दोन एड्सबाधीत जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे, एनएमआय सेवा फाऊंडेशन, नेटवर्क नंदुरबारतर्फे शनिवारी एड्स दिनाचे औचित्य साधून एड्सबाधीत दोन जोडप्यांचा विवाह समारंभ झाला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील,  कार्यकारी संचालक  पी.आर. पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील,  तहसीलदार मनोज खैरनार, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नगरसेवक संजय साठे, नाना निकुम, ज्ञानेश्वर चौधरी, नगरसेविका रिमा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल भामरे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, धडगावचे पोलीस निरीक्षक संजय भामरे आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात एड्सबाधीत जोडप्यांचा पहिला सोहळा होता. प्रारंभी 26/11 च्या मुंबई हल्ल्यात शाहीद झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले की, एड्सबाधीतांचे विवाह लावून राज्यात एक वेगळा संदेश यानिमित्त गेला आहे. हा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. एड्सग्रस्तांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रय}शील राहणार असल्याचे ते म्हणाले.  जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील म्हणाले की, आज आदर्श विवाह झाला असून समाजात असे विवाह खूप वेगळे स्थान राखतो. त्यातून शहीदांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. एड्स या आजाराची गंभीरता खूप असल्याचे सांगून एड्सबाधीतांच्या जीवनात फुलांकूर फुलवणा:या सपकाळे यांचे त्यांनी कौतुक केले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, एड्सबाधीतांसाठी राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अविस्मरणीय आहे. समाजात बरेच उपक्रम राबविले जातात. मात्र खाकी वदीर्तील व्यक्ती माणुसकी जपतो हे विशेष आहे. सपकाळे यांच्यासारखी माणसे समाजात अजून निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.प्रास्ताविकात डीवाय.एस.पी. पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले की, सामाजिक उपक्रमातून समाजासाठी आपण काही देणे लागतो हे साध्य करीत शहीद हेमंत करकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्सबाधीतांसाठी काम करण्याचा प्रय} केला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रातील लोकांचे यासाठी सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी अब्बास नुरानी, इरफान पठाण, काशीनाथ पाटील, शाम जाधव, राम जाधव, गिरीश पाटील, नासीर मिस्तरी, माजी नगरसेवक के.डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, प्रा.लियाकत सैयद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस कार्यालयातील कर्मचा:यांनी सहकार्य केले.