शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार पूजनाची ‘सातपुडय़ा’त अनोखी प्रथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोणताही उद्योगाच्या भरभराटीत कामगारांचे कष्ट खूप मोलाचे असतात. कामगारांनी रक्ताचे घाम करून कष्ट केले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोणताही उद्योगाच्या भरभराटीत कामगारांचे कष्ट खूप मोलाचे असतात. कामगारांनी रक्ताचे घाम करून कष्ट केले तरच उद्योगाला उत्तुंग वैभव प्राप्त होऊ शकते. उद्योग आपलाच आहे या भावनेने अपार कष्ट सोसणा:या कामगारांचे मोल फक्त पैशाने मोबदला देऊन करता येत नाही तर त्याचा सन्मानाचे रक्षण करणेही तेवढेच महत्वाचे असते. याच भावनेने कामगारांशी सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे व त्यांचा स्वाभिमान व सन्मानही राखला जावा यासाठी धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी कामगारांनाच ‘धन’ मानून त्यांची पूजा करण्याची आगळीवेगळी परंपरा श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे  कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सुमारे 20 वर्षापासून जोपासली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याजवळील धनाची पूजा करण्याची आपली परंपरा आहे. सातपुडा साखर कारखान्यात मात्र आपल्या कारखान्यातील कामगारांनाच धन मानून गेल्या 20 वर्षापासून कामगारांची पूजा केली जाते. यंदाही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दत्तात्रयाच्या पूजेसोबतच कामगारांची पूजा केली. कारखान्यात आजच्या स्थितीत  सुमारे 650 कामगार कार्यरत आहेत. त्यांना नियमित पगार तर दिला जात आहेच शिवाय दीपावलीचा बोनसही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यासोबतच कामगारांचा सन्मान केला जात असल्याने  त्यांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना कामगारांची आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी शेतकरी व कामगारांच्या हितासाठी  उभारलेल्या  शेतक:यांच्या मालकीच्या असलेल्या सातपुडा साखर कारखान्याच्या उभारणीने परिसराला वैभव प्राप्त झाले  आहे. अनेक अडचणींवर मात करीत हा कारखाना शेतकरी व कामगाराच्या हितासाठी कार्यरत आहे. कारखान्याचे विद्यमान चेअरमन दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरु आहे. कारखान्यामुळेच शेतक:यांना सुखाचे दिवस आले आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत कामगार हा घटक अतिमहत्त्वाचा आहे. त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे. यंदाही परिसरात उसाचे प्रमाण मुबलक असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालून शेतक:यांच्य सर्व उसाचे  गाळप करून  निर्धारित साखरेची निर्मिती होणार आहे. त्यात कामगारांचीही मेहनत मोलाची असणार आहे. कामगार उत्साहाने आपला कारखाना चालवतील असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे. कामगारांना धन मानून त्यांची विधिवत पूजा करून त्यांचा  यथोचित सन्मान करणा:या सातपुडा साखर कारखान्याचा हा अनोखा उपक्रम नक्कीच कामगारांना प्रोत्साहन देणारा तर आहेच अनुकरणीयही   आहे.