ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 19 - नंदुरबार शहरातील धानोरा रोड भागातील भिलाटीत राहणा:या सातवर्षीय खुशीला लायन्स क्लबच्या पुढाकाराने पाय बसवण्यात येणार आह़े गँगरीनग्रस्त खुशीला पाय बसवून देण्यासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले आह़े सात वर्षीय खुशी राजेश वळवी हिला तीन वर्षापूर्वी गँगरीनची बाधा झाली होती़ यामुळे तिचा एक पाय कापावा लागला होता़ ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात अपंगत्व आलेल्या खुशीची ही समस्या शहरातील सेवाभावी नागरिकांर्पयत पोहोचली होती़ यात डॉ़ सी़डी़महाजन यांनी तिची तपासणी करून उपचार केले होत़े सहभाग घेत खुशीची तपासणी केली होती़ नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरात खुशीची तपासणी करून पाय देण्याबाबत चर्चा झाली होती़ या चर्चेअंती साने गुरूजी आरोग्य केंद्र पुणे यांनी तिला पाय उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. हा पाय येत्या दीड महिन्यात बसवण्यात येणार आह़े त्यासाठी तिला पुणे येथे रवाना करण्यात आले आह़े हा पाय बसवल्यानंतर सात वर्षीय खुशीही शाळेत जावू शकणार आह़े तसेच नित्याची कामे स्वत:हा करू शकणार आह़े लायन्स क्लबतर्फे खुशी आणि तिच्या पालकांच्या प्रवास खर्चासोबत पुणे येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आह़े खुशी हिला रवाना करतेवेळी नंदुरबार लायन्सचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, श्रीराम दाऊतखाने, जितेंद्र जैन, भरत पटेल आदी उपस्थित होत़े खुशी हीचे पालक निरक्षर असल्याने त्यांच्या मदतीसाठी दोन स्वयंसेवकही पुणे येथे त्यांच्यासोबत रवाना करण्यात आले आहेत़सातवर्षीय खुशीची इच्छाशक्ती मोठी आह़े पुणे येथे सानेगुरूजी आरोग्य केंद्रात तिला पाय बसवण्यात येणार आह़े कृत्रिम पाय बसवल्यानंतर तिला तिच्या सर्व दैनंदिनक्रिया या सहजतेने करता येणे शक्य होणार असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ़सी़डी़ महाजन यांनी सांगितले.
कृत्रिम पायाची अनोखी ‘खुशी’
By admin | Updated: May 19, 2017 13:39 IST