शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

टाकाऊ वस्तूंपासून तयार झाले अनोखे गार्डन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 12:01 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : टाकाऊ टायर, तेलाचे डबे, शितपेयाच्या बाटल्या यांचा कल्पकतेने       ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : टाकाऊ टायर, तेलाचे डबे, शितपेयाच्या बाटल्या यांचा कल्पकतेने             वापर करून त्यांचे गार्डन तयार करीत     त्यातूनच विद्याथ्र्याना हसतखेळत शिक्षण देण्याचा अनोखा प्रयोग घोगळपाडा, ता.नवापूर येथील शाळेने केला आहे. शाळेने टाकाऊपासून टिकावू तर तयार केलेच, परंतु पर्यावरणाचा देखील संदेश यानिमित्ताने दिला आहे. घोगळपाडा हे नवापूर तालुक्यातील आदिवासी वस्तीचे गाव. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून एक ते चार वर्ग आहेत. शाळेचा विस्तीर्ण परिसराचा उपयोग करून घेण्यासाठी नेहमीच येथे प्रय} झाला आहे. शिक्षकांसह ग्रामस्थांचेही सहकार्य त्यासाठी लाभले आहे. गुणवत्तेबाबत देखील शाळा नेहमीच अव्वल ठरली आहे. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी शाळेने टाकावू वस्तूंचा खुबीने वापर करून त्याचे गार्डन तयार केले. या वस्तूंवर मराठी व इंग्रजी वर्णमाला, अंक, नकाशे आणि भौमितीक आकृत्या काढल्या आहेत. हसतखेळत अभ्यास ही संकल्पना त्यातून राबविण्यात आली आहे. घोगळपाडा      शाळेचे टाकाऊपासून टिकावूचे हे अनोखे गार्डन सध्या शैक्षणिक वतरूळात चर्चेचा विषय ठरले आहे. शाळेचे शिक्षक दिनेश पाटील यांनी सांगितले, उपक्रमशील शाळा म्हणून घोगळपाडा शाळा नेहमीच ओळखली जाते. विद्यार्थी, शिक्षक यांच्या परिश्रमातून आणि गावक:यांच्या सहकार्यातून टाकाऊ टायर, थंडपेयाच्या बाटल्या व  तेलाचे डबे यांचा वापर करून  त्यांना आकर्षक अशी रंग रंगोटी करण्यात आली. त्यातून स्वच्छ व सूंदर अशी बाग तयार झाली आहे. त्यात विविध फुलझाडे व पाम वृक्ष अशा रोपाचे रोपण करण्यात आले आहे. त्याचा शालेय अध्ययन अध्यापनात विशेष परिणाम दिसून येत आहे. टायर वर इंग्रजी वर्णाक्षर व भौमितिक आकार काढण्यात आला असून सुंदरतेसह विद्याथ्र्यांना अध्ययनासाठी त्याची विशेष मदत होत आहे.  गार्डनच्या देखरेखीसाठी विद्याथ्र्यांचे व्यवस्थापन मंडळ स्थापन  करण्यात आले असून त्या माध्यमातून दररोज रोपांना पाणी देणे , निगा राखणे हे काम विद्यार्थी स्वयंप्रेरणेने करत आहेत. बालवयातच त्यांना निसर्गाप्रती आपला आदरभाव ठेवण्याची सहजप्रवृत्ति विकसित होत आहे. सातत्याने या शाळेतून चांगले विद्यार्थी घड़त असून येथून सातत्याने  नवोदयला जाणारे विद्यार्थी अशी शाळेची ओळख निर्माण झालेली आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी जी. पी.मगर, केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी, मुख्याध्यापक संजय जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. शाळेच्या नावलौकिकासाठी सहशिक्षक वसंत कामडे, अनिल वळवी, दिनेश पाटील, कविता जाधव, ललिता वळवी, साईनाथ पाटील हे परिश्रम घेत आहेत.

बालवयातच जागृती..बालवयातच पर्यावरणाविषयी मुलांच्या मनात जागृती निर्माण केली तर त्याचा त्यांना पुढील आयुष्यासाठी चांगला उपयोग होतो. शिवाय त्यांच्या वागण्यातून घरात, शाळेत याविषयी सकारात्मक परिणाम दिसून येतो. हेच डोळ्यासमोर ठेवून शाळेने हा उपक्रम राबविला आहे. खराब टायर, डबे उघडय़ावर पडून राहिल्यास त्यात पाणी साचून डास व मच्छर तयार होतात. शितपेयाच्या बाटल्या गटारीत पडल्यास गटार तुंबण्याचे प्रकार होतात. त्यामुळे विद्याथ्र्याना या बाबी या माध्यमातून समजावून देत त्यांच्यात जागृती आणण्याचा प्रय} शाळेतील शिक्षकांचा दिसून येत आहे.