लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : कंजाला ता़ अक्कलकुवा येथे सातपुडय़ातील कंद, रानभाज्या, बियाणे आणि वनस्पतींचे संगोपन व्हावे या उद्देशाने मेराली जैवविविधता केंद्राची निर्मिती करण्यात आली आह़े या केंद्राचे उद्घाटन खासदार डॉ़ हीना गावीत व विकास कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्याहस्ते करण्यात आल़े यानिमित्त याठिकाणी ‘आमू बादा आमू आखा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत़े यात दुर्गम व अतीदुर्गम भागातून वनस्पती, कंद, बियाणे आणि रानभाज्या यांची मांडणी करण्यात आली होती़ या सर्व जैवविविधतेला शास्त्रीय नावे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आल़े प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र कोळदाचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, माजी आमदार नरेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य किरसिंग पाडवी, कृषीतज्ञ डॉ़ गजानन डांगे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक राजेंद्र दहातोंडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सरपंच यांची कार्यक्रमास उपस्थिती होती़ एकलव्य आदिवासी ग्रामीण विकास संस्था कंजाला यांच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला़ प्रारंभी पारंपरिक वाद्य वाजवून केंद्र आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आल़े रामसिंग वळवी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली़ डॉ़ डांगे यांनी जैविक विविधता कायदा, त्यातील तरतुदी व शाश्वत विकासाच्या दृष्टीने लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या केंद्राचे महत्त्व पटवून दिल़े चैत्राम पवार यांनी या जैवविविधता केंद्राचा प्रयोग संपूर्ण सातपुडय़ाला दिशादर्शक व प्रेरक ठरेल असे सांगत केंद्राद्वारे निरंतर प्रशिक्षणाचे कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली़
कंजाला येथे रानभाज्या, कंद, बियाणे अन् वनस्पतीचे अनोखे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:13 IST