शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीने शहादेकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 12:56 IST

रस्ता सुरक्षा सप्ताह नावालाच : जीवघेणी प्रवासी वाहतूक, अवजड वाहनांचा सर्रास वावर

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नुकतेच राबविण्यात आलेले राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान फक्त नावापुरतेच राबविण्यात आल्याची स्थिती शहरातील वाहतूक व्यवस्थेवरून दिसून येते. या अभियानात जनजागृतीसाठी सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून शहरातील मुख्य रस्ते व चौकांमधील बेशिस्त वाहतुकीने नागरिक त्रस्त झाले आहेत.शहर व परिसरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक होत आहे. बसस्थानक परिसर, गांधी पुतळा, स्टेट बँक परिसर, मेनरोड आदी रस्ते व चौकांमध्ये बेशिस्त वाहने चालविण्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरातील डोंगरगाव रस्त्यावर खाजगी वाहतूक करणा:या वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होते. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता वाहनाच्या मागील बाजूस उभे राहून प्रवास करतात. बसस्थानक परिसरातही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता रस्त्यातच उभी केली जातात. याठिकाणी बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने व बसस्थानकात येणा:या-जाणा:या बसेसमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. या परिसरात नेमणुकीला असलेले वाहतूक पोलीसदेखील बघ्याची भूमिका घेतात. गांधी पुतळा परिसरात एकेरी मार्ग असूनदेखील वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. डायमंड बेकरीजवळ तीनचाकी व अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना दिवसभर याठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने वाहतुकीची वारंवार कोंडी होते.नुकत्याच राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यासाठी पोलीस विभागातर्फे विविध उपक्रमही राबविण्यात आले. मात्र वाहने बेशिस्तपणे चालविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतुकीची वारंवार कोंडी होणे हे प्रकार पुन्हा        सुरू झाल्याने रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा:या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊन वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होणार आहे.