लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कोण भरत गावित? त्यांना चेक पोस्टला बोलवा, पैसे घेतल्याशिवाय गाडी जाऊ देणार नाही. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील सदभाव इंटरप्राईजेस लिमिटेड येथील कर्मचाऱ्यांने भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित यांची गाय घेऊन येणाऱ्या वाहन चालकाकडे एक हजार रुपयांची अनधिकृतपणे मागणी चालकाकडे केली. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात भरत गावित यांनी लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.नवापूर भाजपाचे तालुकाध्यक्ष भरत माणिकराव गावित गीरगाय पालन करीत आहेत. गावित यांनी शेतामध्येच गोशाळा तयार केली आहे. गुजरात राज्यातील विविध भागातून गाय आणून ते गो-पालनाचे काम करत आहेत. सोमवारी दुपारी गुजरात राज्यातील जुनागड येथून चालक भरत भरवाड हे (जी जे २६ टी - ७४२६ ) या वाहनाने गाय नवापूरला घेऊन येत असताना, नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील सदभाव इंटरप्राईजेस लिमिटेड येथील कर्मचाऱ्यांने गाडी थांबून एक हजार रुपयांची मागणी चालकाकडे केली. चालक भरत भरवाड यांनी सांगितले की सदर ही गीरगाय भरत गावित यांच्या शेतात घेऊन जात आहे. असे सांगितले त्यांचे कार्ड दाखवलं ते ही फेकून दिले.त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. कोण भरत गावित, आम्ही भरत गावितला ओळखत नाही. त्यांना इथे बोलवा असं उर्मटपणे बोलण्याने थेट भरत गावीत सीमा तपासणी नाक्यावर पोचले. आणि हा प्रकार समोर आला.अनधिकृतपणे एक हजाराची मागणी केल्याची माहिती भरत गावीत यांनी दिली. ते गाय घेऊन सरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आले. नवापूर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना संपूर्ण माहिती दिली. सीमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्याच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भरत गावित यांनी तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.नवापूर सीमा तपासणी नाक्यावर कुठलाही गणवेश न परिधान करता सदभाव इंटरप्राईजेस प्रायव्हेट लिमिटेड वजन काटा करण्यासाठी खाजगी पंटर बसून अनधिकृतपणे अव्वाच्या सव्वा पैसे घेण्यसाठी पंटर आहेत संदर्भात योग्य कारवाई झाली पाहिजे गो पालनासाठी गाय जाऊ देत नाही परंतु दररोज मोठ्या संख्येने कत्तलीत गाई जात असतात यावर कुठलीही कारवाई होत नाही ही लाजिरवाणी बाब आहे.नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील सदभाव इंटरप्राईजेस कंपनीचा काय दोष आहे. घटनेची सत्यता तपासून कारवाई करण्यात येईल, अद्याप तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरिक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.या घटनेची नवापुरात दिवसभर चर्चा होती.
सीमा तपासणी नाक्यावर अनधिकृतपणे वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 21:59 IST