शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उज्वला योजनेचा नवीन 12 हजार कुटुंबांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : केंद्रशासनाच्या उज्वला गॅस योजनांपासून वंचित राहिलेल्या कुटुंबाना गॅस कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने योजनेचा राज्यात विस्तार केला आहे. तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 कुटुंबांना लाभ देण्याचा येथील प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. तळोदा येथील पुरवठा शाखेकडून तशी कार्यवाही स्वस्तधान्य दुकानदारांमार्फत सुरू करण्यात आली आहे.  तथापि याप्रकरणी दुकानदारांना अर्ज भरतांना कोणताही दूजाभाव न करण्याची सक्त ताकीद देण्याची अपेक्षा लाभार्थ्ीनी व्यक्त केली आहे.दारिद्रय़ रेषेखालील गरीब, गरजू कुटुंबासाठी केंद्रशासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्या वर्षीपासून उज्वला गॅस योजना सुरू केली आहे. या योजनेत मोठय़ा प्रमाणात गरीब जनतेला मोफत गॅस कनेक्शन मिळालीत. साहजिकच जनतेमधूनदेखील या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. असे असले तरी अजूनही मोठय़ा  प्रमाणात गरीब व गरजू कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिली आहेत. त्यांनाही लाभ देण्यासाठी राज्यशासनाने योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्याच्या वित्त मंत्र्यांनी अर्थ संकल्पीय भाषणात ‘चुलमूक्त-धूरमुक्त महाराष्ट्र’ अशी घोषणा केली होती. त्यानुसार अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यात आतापावेतो 40.63 लक्ष कुटुंबांना गॅस जोडणीचा लाभ देण्यात आला आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त, नक्षलग्रस्त व आकांक्षित जिल्ह्यांचा या विस्तारीत योजनेत समावेश  केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश करण्यात आल्याने जिल्ह्यातही ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून सुरूही करण्यात आली आहे.तळोदा तालुक्यातील साधारण 12 हजार 500 अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे. येथील पुरवठा शाखेने आपल्या रेशन दुकानदारांना लाभाथ्र्याचे अर्ज भरून घेण्याचे  आदेश दिले असून, ग्रामीण भागातून अशा लाभाथ्र्याचे अर्ज भरून            घेण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी संबंधीत लाभाथ्र्याचे रेशनकार्ड अथवा त्या कार्डात त्यांचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधारकार्ड, बँक पास बुकची सत्यप्रत व दोन पास पोर्ट फोटो अशी कागदपत्रे अपेक्षित  आहेत.तळोदा तालुक्यात साधारण 32 हजार 359 शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. त्यातील 19 हजार 223 जणांना शासनाच्या उज्वला             गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजे अजूनही साडेबारा हजार लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याचे या लाभार्थ्ीना                  योजनेचा लाभ मिळणार आहे. तथापि लाभाथ्र्याचे अर्ज भरतांना दुजाभाव केला जात असल्याचा लाभाथ्र्याच्या तक्रारी असून, बहुसंख्य लाभार्थ्ीना योजनांची माहितीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुरवठा शाखेने याबाबत गंभीर दखल घेऊन तशा सूचना दुकानदारांना द्याव्यात, अशी लाभार्थ्ीची मागणी आहे.