शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उधना-जळगाव दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव या 306 किलोमिटरच्या रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे बाकी असलेले नंदुरबार ते दोंडाईचा दरम्यानचे 35 किलोमिटरचे काम देखील पुर्ण झाले आहे. लवकरच रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त या मार्गाची चाचणी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. अधिकृत उद्घाटनही लवकरच होण्याची शक्यता बळावली आहे.उधना-जळगाव या 306 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी सन 2008-09 मध्ये 715 कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली होती. परंतु मुदतीत हे काम पुर्ण न झाल्याने हा खर्च दुप्पट अर्थात एक हजार 390 कोटी रुपयांर्पयत गेला आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात या कामासाठी थोडय़ा-थोडय़ा निधीची तरतुद होत होती. त्यामुळे काम रेंगाळले होते. आता हे काम पुर्णत्वाच्या मार्गावर आहे. केवळ नंदुरबार-दोंडाईचा दरम्यान बाकी असलेले हे काम 90 टक्के पुर्ण झाले असून केवळ या दरम्यानच्या नवीन मार्गाची चाचणी घेण्याचे बाकी   आहे.पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा मार्गपश्चिम रेल्वेचा महत्वाचा मानला गेलेला ताप्ती सेक्शनचा या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी होती. ती आता पुर्णत्वास येत आहे. 2004-05 मध्ये या कामाला मंजुरी मिळाली होती. तत्कालीन खासदार माणिकराव गावीत यांनी हा रेल्वेमार्ग मंजुर करून आणला होता. परंतु निधिची तरतूद होत नसल्याने तीन ते चार वर्ष हे काम रखडले होते. अखेर 2008-09 मध्ये या कामासाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आल्यानंतर कामाला वेग आला. त्यासाठी विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला.  दरवर्षी निधी मिळत गेल्याने अखेर दहा वर्षानी काम पुर्ण होत आहे. दुप्पटीने वाढला खर्चआधी केवळ 715 कोटी रुपये खर्चाची मंजुरी असलेल्या या रेल्वेमार्गाच्या कामासाठी विलंब होत गेल्याने त्याचा खर्च दुप्पट वाढला. तब्बल एक हजार 390 कोटी रुपयांचा सुधारीत बजेट तयार करून ते काम सुरू करण्यात आले. सध्य स्थितीतही खर्च वाढला आहे.306 किलोमिटर लांबीभुसावळ-सुरत म्हणून हा रेल्वेमार्ग ओळखला जातो. या रेल्वेमार्गापैकी भुसावळ ते जळगाव व सुरत ते उधना या दरम्यान या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आहेच. त्यामुळे उधना ते जळगाव या मार्गाचे अर्थात 306 किलोमिटरचा दुसरा रेल्वे मार्ग टाकला जाणार होता. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. आधी जळगाव कडून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर चलथान कडून कामाला सुरुवात झाली. असे झाले कामउधना-जळगाव या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगवेगळ्या टप्प्यात पुर्ण करण्यात आले आहे. त्यात 2009 मध्ये धरणगाव ते अमळनेर हे 15 किलोमिटरचे काम पुर्ण झाले. 2010 मध्ये उकई ते व्यारा या दरम्यानचे 25 किलोमिटरचे, 2013 मध्ये उकई ते नवापूर या 40 किलोमिटर मार्गाचे, 2014 मध्ये व्यारा ते बारडोली या 25 किलोमिटर, धरणगाव ते चावलखेडा या 20 किलोमिटर व नवापूर ते चिंचपाडा या 40 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाले होते. 2016 मध्ये चिंचपाडा ते नंदुरबार या 30 किलोमिटर, अमळनेर ते होळ या 25 किलोमिटर रेल्वेमार्गाचे काम पुर्ण करण्यात आले होते. 2017 मध्ये होळ ते दोंडाईचा या 27 किलोमिटर या मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले होते. आता 2018 मध्ये उधना ते चलथान  या 11 किलोमिटर मार्गाचे काम पुर्ण झाले असून मार्च अखेर नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्णत्वास आले आहे.उधना-जळगाव या दरम्यानच्या रेल्वेमार्गापैकी केवळ नंदुरबार ते दोंडाईचा या 35 किलोमिटरचे काम बाकी होते. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांनी मार्च अखेर मुदत दिली होती. रेल्वेच्या संबधित विभागाने ते आव्हान पेलून ते काम मार्च अखेर पुर्ण करण्याचा प्रय} केला आहे. आता रेल्वे ट्रॅकचे निरिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत या 35 किलोमिटर रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात येईल. नेहमीच्या वेगात चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. येत्या आठ दिवसात ही चाचणी होणार आहे. त्यानंतर या दुस:या रेल्वे मार्गाचे अधिकृतरित्या उद्घाटन केले जाणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार    आहे.