नंदुरबार : आयशर व दुचाकीच्या समोरा-समोर झालेल्या अपघातात दोन तरुण ठार तर एक तरुणी जखमी झाले आहेत़ ही घटना शुक्रवारी दुपारी अंकलेश्वर-बºहाणपुर रस्त्यावरील गव्हाली फाटा जवळील फॉरेस्ट चेकपोस्टजवळ घडली़आयशर चालक (एमएच़ १९ झेड़ ०९३०) आरोपी किशोर पुंडलिक भापकर (वय ३२, रा़ रांझणी ता़ तळोदा) भरधाव वेगात गाडी चालवत असताना गव्हाली फाटा जवळील फॉरेस्ट चेकपोस्ट जवळ समारुन येत असलेल्या दुचाकीला (जीजे २६ क्यु ९१७८) समोरुन जोरदार धडक दिली़ दुचाकीवर असलेल्या आकाश प्रतापसिंग नाईक (वय २२, रा़ जुना कावठा ता़ निझर, जि़ तापी), जिग्नेश प्रभु वसावा (वय २०, रा़ नवी बावली ता़ सोनगढ, जि़ तापी) यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक तरुणी संगिताबेन खोजल्या वसावा (वय १९, रा़ बालालकुवा ता़ उमरपाडा) ही जबर जखमी झालेली आहे़ अपघात होताच आरोपी किशोर भापकर यांने घटनास्थळावरुन पळ काढला़ अजित गावीत यांच्या फिर्यादीनुसार अक्कलकुवा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास हवालदार शिरसाठ करीत आहेत़
आयशर-दुचाकीच्या अपघातात दोन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:07 IST