शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात एकाच क्रमांकाची दोन वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 12:47 IST

नवापूर : एकाच क्रमांकाचे जिल्ह्यात दोन वाहन असल्याचे महिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले आहे. चार वर्षांत दोन वाहनांना एकच क्रमांक कसा देण्यात आला?  असा प्रश्न उपस्थित होत असून यातून प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आह़ेनवापूर येथील कॉलेज रोडवर वास्तव्यास असलेले कमलेश रामधन मीना यांचा ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यवसाय असून ...

नवापूर : एकाच क्रमांकाचे जिल्ह्यात दोन वाहन असल्याचे महिती अधिकार कायद्याअंतर्गत उघड झाले आहे. चार वर्षांत दोन वाहनांना एकच क्रमांक कसा देण्यात आला?  असा प्रश्न उपस्थित होत असून यातून प्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आह़ेनवापूर येथील कॉलेज रोडवर वास्तव्यास असलेले कमलेश रामधन मीना यांचा ट्रान्सपोर्ट कंपनीचा व्यवसाय असून त्यांनी 2011 साली अवजड माल वाहतूकीसाठी ट्रक खरेदी केला होता़ त्या ट्रकची प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्याकडे अधिकृत नोंदणी केली असता त्यांना एमएच 39 सी 1077 असा क्रमांक देण्यात आला. चार वर्षा नंतर सन 2015 साली कमलेश मीना यांना याच क्रमांकाची महिंद्रा कंपनीची अवजड वाहतूक करणारी दूसरी ट्रक आढळून आली. खात्री करण्यासाठी त्यांनी परिवहन विभागाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर बघितले असता त्यांचा संशय खरा निघाला. या बाबत त्यांनी प्रादेशीक परिवहन विभागाच्या नंदूरबार येथील कार्यालयात खूलासा मागीतला असता प्रथमत: उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. चार वर्षा पासून त्यांचे प्रय} सुरु असुनही संबंधित विभागाकडून कूठलाही प्रतीसाद मिळत नसल्याने मीना यांनी नाराजी व्यक्त करीत तालुका लोकशाही दिनात या बाबतची तक्रार केली.  2011 मध्ये एका वाहनास दिलेला क्रमांक 2015 मधे पुन्हा दुस:या  वाहनास कसा दिला गेला? हा प्रकार बेकायदेशीर असून या बाबत आठ दिवसांत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खूलास न आल्यास व माङया वाहनाचा असलेला क्रमांक आहे तसाच ठेवून दुस:या वाहनाचा तोच क्रमांक रद्द न केल्यास  वरिष्ठ पातळीवर जाऊन तक्रार दाखल करण्यासाठी कमलेश मीना यांनी 6 सप्टेंबर रोजी महिती अधिकार कायद्यांअंतर्गत माहिती मागितली असता अभिलेख विभागाकडून दोन वाहन धारकांना एकच क्रमांक  देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे.दरम्यान दुसरे वाहन हे शासनाकडे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे दिसून आले आह़े हे वाहन कोणाच्या मालकीचे याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत़ कमलेश रामधन मीना यांनी राज्याचे परिवहनमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्या कार्यालयाकडून कोणताही खुलासा न मिळाल्याने नवापूर तालुका लोकशाही दिनात उप प्रादेशिक परिवहन कार्यालया कडून एकच क्रमांक दोन वाहनांना दिल्याची बाब बेकायदेशीर असून सबंधित विभागाची सखोल चौकशी करून दोषी अधिका:यांवर कठोर कारवाई करून आठ महिन्यांपासून वाहन उभे असल्याने त्यापोटी झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी. नोंदणी असलेला क्रमांक न बदलता आहे तशीच नोंदणी ठेवण्यात यावी अशी मागणी आजच्या लोकशाही दिनात त्यांनी केली आहे.