शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरफोडय़ांमध्ये कारसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:01 IST

हुडको कॉलनी : चावी हाती लागताच कारही नेली चोरून

नंदुरबार : शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून 11 ऑक्टोबर रोजी रात्री चोरटय़ांनी पुन्हा घरफोडी करून एक लाखाची कारसह दुस:या घरातून तीन हजारांचे दागीने लंपास केल्याची घटना हुडको कॉलनी व मदनमोहन नगरात घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, हुडको कॉलनीत राहणारे हर्षल सुनील वसावे हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराची संधी साधून चोरटय़ांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात त्यांना किंमती ऐवज न मिळाल्याने त्यांनी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवलेली कारची चाबी घेवून अंगणात उभी असलेली कार चोरून नेली. आरसी बूकसह एकलाख रुपयांची कार चोरून नेल्याची फिर्याद हर्षल वसावे यांनी उपनगर पोलिसात दिली. तेथून चोरटे लगतच्या मदनमोहन नगरात गेले. सुरेश वानखेडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील सोन्याचे दागीने लंपास केले. 20 हजार रुपयांची सोन्याची चेन व दहा हजार रुपये किंमतीची अंगठी चोरटय़ांनी चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण  आहे. चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीांकडून होत आहे.