लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणाजवळील वळण रस्त्यावर खेतियाकडून शहादाकडे जाणारे कंटेनर पलटी होऊन दोन जण जखमी झाल्याची घडली.याबाबत असें की, शहादा-खेतीया मार्गावरील सुसरी धरणाजवळील वळण रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून दुचाकी वाहने घसरून दुखापती झाल्याचा घटना घडत आहे. चिखलमय रस्ता झाल्याने दररोज अनेक दुचाकी वाहनधारकांचे अपघात होत आहे.गेल्या दोन ते तीन महिन्यापासून खेतीया-शहादा रस्त्यावरील सुसरी धरण वळणावर रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्याला बगल देत रस्त्याच्या बाजुने माती मिश्रित मुरूमाचा भराव करून रस्ता तयार केला आहे.मध्य प्रदेशाला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गाने मोठ्या वाहनांसोबत लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू असते. त्यात पाऊस पडल्यानतर या मातीमिश्रित मुरूमाचा चिखल होत असतो. याठिकाणी खेतियाहुन शहादाकडे जाणारी कंटेनर क्रमांक टी.एन. ५२ जे. ०१८० ही रस्ता खचल्याने पलटी झाली. यात चालक व सहचालकाच्या डोक्याला व पायाला जबर मार लागून जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ ब्राह्मणपुरी येथील आकाश जैन, दीपक जैन यांनी शहादा येथील खाजगी दवाखान्यात रवाना केले.मध्य प्रदेशाला जोडणारा हा एकमेव मार्ग असून, या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता भरावासाठी माती मिश्रित मुरूमाच वापर करण्यात येत आहे. हा माती मिश्रित मुरूम पावसाळा सुरू होताच खचण्याची भीती अधिक आहे. तसेच या रस्त्याच्या आजू बाजुला मोठ्या प्रमाणावर खड्डा असल्याने रस्ता खचून अपघात होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे, असे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. परंतु त्या वृत्ताकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शहादा-खेतिया रस्त्यावर सुसरी धरणाजवळ कंटेनर पलटी झाल्याने दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:49 IST