लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील देवलीपाडा-विसरवाडी रस्त्यावर पुढे चालणा:या पिकअपवर दुचाकी धडकल्याने एक ठार तर दोघे जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. योहान जयंत्या गावीत (30), प्रकाश भिमसिंग गावीत (12), भिमसिंग लालजी गावीत (40) हे तिघे एम एच 39 एल 1278 देवलीपाडा येथून विसरवाडी कडे जात होत़े दरम्यान बंगलाफळी फाटय़ाजवळ त्याच वेळी पुढे चाजणा:या पिकअप वाहनक्रमांक एमएच 39 सी 9314 वरील चालकाने ब्रेक मारुन वाहन जागीच थांबवले होत़े यातून मागून भरधाव वेगाने येणारी मोटारसायकल पीकअपवर धडकली़ धडकेत योहान गावीत या युवकाला डोक्याला डोक्यात गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. तर सोबत असलेले प्रकाश गावीत हा बालक व त्याचे वडील भिमसिंग हे दोघेही गंभीर जखमी झाल़े याबाबत भिमसिंग गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पीकअपचालक किल्लू हा:या गावीत याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े किल्लू गावीत यास अटक केली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनात अरुण कोकणी करीत आहे.
पिकअपवर दुचाकी धडकून एक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:53 IST