शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे भिंत कोसळून दोन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : येथील पिपरहाटीतील कलाबाई काशीनाथ भील यांच्या झोपडीवर मागील बाजूच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रकाशा : येथील पिपरहाटीतील कलाबाई काशीनाथ भील यांच्या झोपडीवर मागील बाजूच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. प्रकाशा येथील पिपरहाटीत कलाबाई भिल ह्या मुलगा, सून व व नातवंडांसह राहतात. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झोपले असताना घराच्या मागील बाजूची भिंत अचानक त्यांच्या झोपडीवर कोसळली. त्यात सोमेश प्रकाश भिल याच्या डोक्याला मार लागला तर शंकर प्रकाश भील याला मुका मार लागला  आहे. भिंत कोसळल्याचा आवाज येताच कलाबाई भिल यांनी नातवंडांना घेऊन बाहेर निघाल्या. दोन्ही जखमी मुलांवर औषधोपचार करण्यात आले. प्रकाशाचे तलाठी डी.एम. चौधरी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. या वेळी सरपंच सुदाम ठाकरे उपस्थित होते. भिंत कोसळल्याने कलाबाई भिल यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.