लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : प्रकाशा ता. शहादा येथे अवैध दारू विक्री वाहतूक करणा:या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. रिक्षासह एक लाख 97 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्रकाशा बसस्थानक ते केदारेश्वर मंदिर परिसरात अवैध दारूची वाहतूक विक्री करणा:यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापे टाकले. अविनाश वसंत गुरव, गणेश नथ्थू सोनवणे ,गणेश सुकलाल पाडवी रा. प्रकाशा या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक बॉक्स टॅंगो पंच देशी दारू व सात बॉक्स किंगफिशर बियर व रिक्षा जप्त करण्यात आलीे. एकुण एक लाख 97 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोज संबोधी ,अनुप कुमार देशमाने, प्रशांत पाटील, मोहन पवार, रामसिंग राजपुत व पथकाने कारवाई केली.
दोन लाखांची दारू प्रकाशात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:02 IST